पीक नष्ट होण्याच्या भीतीने भरवस्तीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:40 AM2021-08-17T04:40:46+5:302021-08-17T04:40:46+5:30
लाखांदूर (भंडारा) : काही दिवसांपासून पाऊस येत नसल्याने पाण्याअभावी शेती नष्ट होण्याच्या भीतीने तणावात असलेल्या एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने ...
लाखांदूर (भंडारा) : काही दिवसांपासून पाऊस येत नसल्याने पाण्याअभावी शेती नष्ट होण्याच्या भीतीने तणावात असलेल्या एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील तावशी येथे भरवस्तीत रविवारी (दि. १५) सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान घडली. अशोक सीताराम वालदे (६२, रा. तावशी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अशोक वालदे यांची गावात एक एकर व अन्य मिळून एकूण दोन एकर शेतजमीन आहे. यंदाच्या खरिपात या शेतजमिनीत विविध पीक लागवडीकरिता वालदे यांनी पीक कर्जाची उचल केली होती. मात्र गत काही दिवसांपासून तालुक्यात पाऊस होत नसल्याने पावसाअभावी रोवणी वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, वालदे यांनी तणावात येत भरवस्तीत स्वमालकीच्या घरासमोर जांभळीच्या झाडाला गळफास लावून घेतला. शेतकऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मृत्यू झाला. घटनेची नोंद दिघोरी मोठी पोलिसांनी केली आहे. तपास दिघोरी मोठीचे ठाणेदार नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात अनिल नंदेश्वर करीत आहेत.
160821\img-20210815-wa0041.jpg
मृतक अशोक सिताराम वालदे रा तावशी