धारगाव येथे एक शेतकरी,एक पीक प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:13+5:302021-08-23T04:37:13+5:30

भंडारा : तालुक्यातील धारगाव येथील येथील शेतकरी प्रमोद गिर्हेपुंजे यांची एक शेतकरी, एक पीक प्रात्यक्षिक या उपक्रमात निवड करण्यात ...

A farmer at Dhargaon, a crop demonstration | धारगाव येथे एक शेतकरी,एक पीक प्रात्यक्षिक

धारगाव येथे एक शेतकरी,एक पीक प्रात्यक्षिक

Next

भंडारा : तालुक्यातील धारगाव येथील येथील शेतकरी प्रमोद गिर्हेपुंजे यांची एक शेतकरी, एक पीक प्रात्यक्षिक या उपक्रमात निवड करण्यात आली. या शेतकऱ्याला आरसीएफने खरीप हंगामासाठी दत्तक घेतले आहे. यामध्ये कंपनीकडून मोफत खते, माती परीक्षण व जैविक औषधे पुरविण्यात आले.

शासकीय कंपनी आरसीएफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक मधुकर पाचारणे, मुख्य प्रबंधक विदर्भ एम. एच. पटेल, वरिष्ठ प्रबंधक नागपूर प्रकाश पाठक, उपप्रबंधक नागपूर पवन भारशंकर, नारळे, अमोल लहाने हे सर्व घारगाव येथील दत्त शेतकरी प्रमोद गिरेपुंजे यांच्या शेतात पीक पाहणी व मार्गदर्शनासाठी पोहोचले.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊन, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती कशी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आरसीएफद्वारा आयोजित जिल्हास्तरीय बीज प्रक्रिया स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. यात प्रथम क्रमांक मोहनदास खंडाईत (पालांदूर), व्दितीय क्रमांक मधुकर अंबादे (दिघोरी मोठी)तर मुरमाडी येथील सतीश बावनकुळे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. यानंतर घारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. संचालन प्रमोद खंडाईत यांनी तर आभार हितेश पंचबुद्धे यांनी केले.

Web Title: A farmer at Dhargaon, a crop demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.