शेतात सर्पदंश, शेतकऱ्याचा मृत्यू; शिवनी शिवारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 14:45 IST2023-08-19T14:44:26+5:302023-08-19T14:45:17+5:30
उपचारासाठी नेतांना त्यांचा वाटेत मृत्यू

शेतात सर्पदंश, शेतकऱ्याचा मृत्यू; शिवनी शिवारातील घटना
देवानंद नंदेश्वर
भंडारा : शेतातील पीक पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला एका विषारी सापाने चावा घेतला. शेतकऱ्याला उपचारासाठी नेतांना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी, दुपारी पाच वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील शिवनी शिवारात घडली.
गंगाधर लांजेवार (५५) रा. बोस वॉर्ड, तुमसर असे सर्पदंशाने मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते वरठी येथील सनफ्लॅग कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी ते आपल्या शेतात शिवनी शिवारात शेतातील पीक पाहण्यासाठी गेले होते. शेतातील धुऱ्यावरून जाताना गवतात दडलेल्या एका विषारी सापाने त्यांना दंश केले. सुरुवातीला त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना भंडारा येथे रेफर करण्यात आले. भंडारा येथे उपचारासाठी नेत्यांनी त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.