सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:39 AM2021-09-06T04:39:27+5:302021-09-06T04:39:27+5:30

सोमलवाडा येथील घटना लाखनी : तालुक्यातील सोमलवाडा येथे घरालगत असलेल्या गोठ्यातील म्हशींना तणीस टाकत असताना विषारी सापाने दंश केला. ...

Farmer dies of snake bite | सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

Next

सोमलवाडा येथील घटना

लाखनी : तालुक्यातील सोमलवाडा येथे घरालगत असलेल्या गोठ्यातील म्हशींना तणीस टाकत असताना विषारी सापाने दंश केला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. राजेश प्रभू लुटे (३२, रा. सोमलवाडा) असे मृताचे नाव आहे.

रात्री जेवण आटोपल्यानंतर गोठ्यात बांधलेल्या म्हशींना चारा म्हणून तणीस टाकत असताना विषारी सापाने राजेशच्या डाव्या हाताला दंश केला. सर्पदंश झाल्याने अस्वस्थ वाटत असल्यामुळे व प्रकृती गंभीर होऊ नये म्हणून घरच्या मंडळींनी तत्काळ लाखनी येथील खासगी रुग्णालयात नेले. खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमोपचार करून ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे कर्तव्य वरील डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर होत असल्याने वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे नेत असताना रविवारी सकाळी ६ वाजता दरम्यान राजेश यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्च्यात पत्नी कविता, पाच वर्षीय मुलगी किरण व दोन वर्षीय निधी ही मुलगी आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तपास पोलीस हवालदार दिगांबर तलमले करीत आहेत.

050921\img-20210905-wa0184.jpg

photo

Web Title: Farmer dies of snake bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.