रोवणीसाठी शेतकरी मिळेल तिथून शोधतो पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:01:10+5:30
पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड करीत आहे. सुमारे दोन हजार ते तीन हजार फुटावरून पाण्याचे नियोजन करून रोवणीकरिता तळमळ पालांदूर परिसरात सुरू झालेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : वरुणराजा रुसला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गत पाच दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस नसल्याने रोवणी प्रभावित झाली आहे. मिळेल तिथून पाण्याचा उपसा करीत शेतकरी रोवणीसाठी धडपड करीत आहे.
पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड करीत आहे. सुमारे दोन हजार ते तीन हजार फुटावरून पाण्याचे नियोजन करून रोवणीकरिता तळमळ पालांदूर परिसरात सुरू झालेली आहे. अद्यापही ४० टक्के रोवणी पावसाच्या अनियमितपणामुळे प्रभावित झाली आहे. शेजारील शेतकऱ्याची रोवणी आटोपल्याने स्वत:चे रोवणी न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
मोटार पंप साहित्य विक्री दुकानात पाईप, इंजिन, मोटारपंप यांच्या विक्रीला गती आली असून शेतकºयाला नाईलाजाने रोवणीसाठी पाण्याची आणि योजनाकरिता पदरचे पैसे खर्च करण्याची वेळ संकटकाळात आलेली आहे. निसर्गाने दिलेल्या कोरड्या दुष्काळात शेतकरी संपूर्णत: समस्याग्रस्त असून सिंचनासाठी वाटेल ती रक्कम खर्च करून तळमळ करीत पाण्याचा शोध घेत आहे.
अधिक तापमानामुळे विजेच अपेक्षित दाब पंपांना मिळत नसल्याने अपेक्षित पाणी शेतकºयाला मिळत नाही. पाण्यासाठी शेतकºयाची दाहीदिशा सुरू असताना मिळेल तिथून मोटार पंपच्या आधाराने रोवणीसाठी पाणी उपसा सुरू आहे. मागणी वाढल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसात दोन-चार वेळा तरी नक्कीच वीज खंडित होत असल्याने तिला सुरळीत करण्याकरिता वीज विभागांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तत्परता बाळगावी लागत आहे.
उष्णतेत कमालीची वाढ
दोन दिवसाच्या असह्य उन्हाने शेतकºयांसह सामान्य माणूस प्रभावित झालेला आहे. जीवघेण्या उष्णतेने बळीराजा सुद्धा हादरला असून झालेल्या रोवणीला किडीने ग्रासलेले आहे. शेतातही राबत असलेल्या मजुरांना असह्य उन्हाने ग्रासले आहे. बांधांना तडे पडले आहे. पाणी आटत असल्याने झालेल्या रोवणीला प्रभाव पडत आहे. गत पाच दिवसात रिमझिम पाऊस न आल्याने झालेली रोवणी करपण्याच्या मार्गावर आहे. तलाव, पाट, बंधारे, छोटे नाले आदींवर कृत्रिम पाणी उपसा साधनांचा वापर करून रोवणीसाठी शेतकरी दाहीदिशा करीत आहे. उन्हाळ्यासारखी परिस्थीती ऐन पावसाळ्यात झाली असल्याने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.