शेतकरी मित्र मोबदल्यापासून वंचित

By Admin | Published: February 15, 2017 12:31 AM2017-02-15T00:31:34+5:302017-02-15T00:31:34+5:30

कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्र मागील चार वर्षापासून मोबदल्यापासून वंचित आहहेत.

Farmer friends deprived of compensation | शेतकरी मित्र मोबदल्यापासून वंचित

शेतकरी मित्र मोबदल्यापासून वंचित

googlenewsNext

परिपत्रकाची अवहेलना : ४६७ शेतकरी मित्रांचा समावेश, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
रमेश लेदे जांब (लोहारा)
कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्र मागील चार वर्षापासून मोबदल्यापासून वंचित आहहेत. परिणामी त्यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. कृषी विभागाच्या आत्मा या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार गावामध्ये एक शेतकरी मित्र या प्रमाणे जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्रांची निवड करण्यात आली होती.
कृषी विस्तार कार्याक्रमांना विषयक सुधारणा करिता सध्या आत्मा अंतर्गत अत्यावश्यक गरजेनुरूप गावपातळीपासूनचे नियोजन व कार्यक्रमांना अंमलबजावणीसाठी स्वयंप्रेरित करण्याकरिता कार्य केले जात आहे. सध्यास्थितीत ज्या ज्या व्यक्तीचे शेतकरी मित्र म्हणून निवड झाली त्यांनी आत्मा विभागाकडून तसेच कृषी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनी आपल्या परिसरामध्ये चार वर्षापासून कामे केली.
तसेच शेतकरी मित्रांना जवाबदारीचा मोबदला म्हणून शेतकरी मित्राच्या क्षमता विकासासाठी प्रशिक्षण, शेतकरी सहल आणि प्रक्षेत्र भेट आदी शासनाकडून तरतुद करण्यात आली आहे. तसेच प्रती शेतकरी मित्रांना चार हजार रूपये त्याची जवाबदारी पार पाडताना मोबदला म्हणून वस्तू स्वरूपात दिले जाईल, असे शासनाच्या परिपत्रकांत नमुद आहे. मात्र मागील तीन वर्षापासून तुमसर तालुक्यासह जिल्ह्यातील ४६७ शेतकरी मित्रांना मोबदला मिळालेलानाही.
या प्रकरणात पाणी कुठे मुरतो याचा शोध घेणे गरजेचे आहे. याकडे राज्यकृषी विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी मित्रांना त्यांच्या हक्काचा मासिक व पेपर सुद्धा पाठविण्याची व्यवस्था केली नसली तरी सर्व शेतकरी मित्रांना पाठविल्याची जिल्हास्तरीय कार्यालयात वाटप केल्याची कागदोपत्री नोंद आहे. निधी नसल्याची बाब आत्मा विभागाच्या जिल्हा कार्यालयातून वारंवार सांगण्यात येत आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Farmer friends deprived of compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.