शेतकऱ्याची भन्नाट आयडिया; ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 10:14 AM2022-02-03T10:14:09+5:302022-02-03T10:26:02+5:30

एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येऊ शकते. ३० मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता आहे.

farmer in bhandara used drone to spray pesticide in farm | शेतकऱ्याची भन्नाट आयडिया; ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी

शेतकऱ्याची भन्नाट आयडिया; ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात पहिल्यांदाच प्रयोगमजूर टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न

मुखरू बागडे

भंडारा : मजूर टंचाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने भन्नाट आयडिया करून ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशक फवारणीचा यशस्वी प्रयोग केला. लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे बुधवारी एका शेतात प्रायोगिक तत्त्वावर फवारणी करण्यात आली. त्यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. वेळ, कीटकनाशक, पैसा आणि मनुष्यबळाची बचत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यात धानासोबतच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. फवारणीच्या कामाला तर कुणीही येत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी ड्रोनने फवारणी करण्याचा प्रयोग जेवनाळा येथील प्रगतशिल शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात करण्यात आला.

बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, पर्यावरण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, तालुका कृषी अधिकारी पात्रीकर, मनिषा नागलवाडे, गौरव तुरकर, तहसीलदार महेश शितोळे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर, विनायक बुरडे, सरपंच वैशाली बुरडे, प्रशांत गिऱ्हेपुंजे, कल्पना सेलोकर, प्रशांत गिऱ्हेपुंजे, संदीप हिंगे, नरेंद्र बुरडे, सविता तिडके, बबलू निंबेकर, दामाजी खंडाईत, इद्रिस लद्धानी, हेमाजी कापसे, नीळकंठ कायते यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

माऊली ग्रीन आर्मीचे सहकार्य

जेवनाळा येथील शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात किसान ड्रोन, माऊली ग्रीन आर्मी, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती आणि आयोटेक वर्ल्ड एरिगेशनच्यावतीने हा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला. टमाटर, मिर्ची आणि वांग्याच्या शेतीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. अगदी कमी वेळात आणि कमी मनुष्यबळात ही फवारणी होत असल्याचे दिसत होते.

एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य

ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येऊ शकते. ३० मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता आहे. एकावेळी चार नोझलद्वारे फवारणी करता येते.

जिल्हा बँक देणार कर्ज सुविधा

मजूर टंचाईवर सामना करण्यासाठी शेतकरी किंवा बचतगट ड्रोन खरेदी करणार असली तर त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज सुविधा उपलब्ध करुन देईल, असे बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: farmer in bhandara used drone to spray pesticide in farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.