पीक पाहून शेतकऱ्याने सोडले शेतात जाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:55 AM2019-07-25T00:55:45+5:302019-07-25T00:57:15+5:30
शेतातील करपलेले पºहे पाहून डोळ्यात अश्रूच्या धारा व त्याची आकाशाकडे नजर, अशी स्थिती सर्वत्र आहे. परिणामी पावसाच्या दडीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडल्याचे वास्तव समोर येत आहे. शेती नांगरून रासायनिक खतासह महागडे बीज पेरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : शेतातील करपलेले पऱ्हे पाहून डोळ्यात अश्रूच्या धारा व त्याची आकाशाकडे नजर, अशी स्थिती सर्वत्र आहे. परिणामी पावसाच्या दडीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडल्याचे वास्तव समोर येत आहे.
शेती नांगरून रासायनिक खतासह महागडे बीज पेरले. हातऊसणे घेऊन कर्जबाजारी झाले. पुन्हा दुबार पेरणीसाठी रक्कम आणावी कुठून असा सवाल आहे. उल्लेखनीय म्हणजे पाणीच नसल्याने दुबारपेरणीची वेळ निधून गेल्याचे शेतकरी सांगतात. तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरातील बºयाच शेतकºयांची अशीच स्थिती आहे.
पीक जिवंत ठेवण्याकरिता बहुतांश शेतकऱ्यांजवळ सिंचनाची कुठलीही सुविधा नाही. विहिरींनीही तळ गाठला आहे.
मग पाणी आणावे कुठून, असा सवाल आहे. काही शेतकऱ्यांनी जिथे पाणी साचले आहे, तिथून मिळेल त्या साधनाने पाणी आणून पºह्यांना जीवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. तरीही पीक करपलेल्या स्थितीत आहे याकरिता डिझेल इंजिन , पाइप खरेदीत बळीराजा पुन्हा कर्जबाजारी झाला आहे.
याविषयी शासन, प्रशासनाला दया येणार काय? बळीराजाला भरपाई भरपाई मिळणार काय? काय विविध प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहे