शेतकऱ्याने पेटविले धानपीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:04 PM2018-10-19T22:04:24+5:302018-10-19T22:04:44+5:30
सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली.
त्यामुळे जगाचा पोशींदा म्हटल्या जाणारा शेतकरी खरोखरच सुखी समृद्ध आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र शेतकºयांच्या प्रश्नाकडे शासन नेहमीच पाठ फिरवत असतो हे यावरून स्पष्ट होते.
अरविंद राऊत रा. साकोली या शेतकºयाकडे खैरलांजी शिवारात अडीच एकर शेती आहे. या शेतकºयाकडे सिंचनाची सोय नसल्याने शेती ही निसर्गाच्या भरोशावरच करावी लागते. मागीलवर्षी राऊत यांनी हंगामात रोवणीसाठी पºहे पेरले होते. मात्र पाऊसच आला नाही.
त्यामुळे रोवणी करू शकला नाही व पºहे तसेच उन्हाने करपले. यावर्षी हीच परिस्थिती येऊ नये व पैसे वाया जाऊ नये म्हणून या शेतकºयाने यावर्षी आवत्या पद्धतीने शेतात घाणाची लागवट केली.
त्यावेळी पाऊस समाधानकारक होता. त्यामुळे शेत धानाने बहरून आले होते. या धानासाठी राऊत यांनी दोनदा खत दिले, एकदा औषध फवारणी केले, निंदन काढले यात त्यांचे जवळपास २० ते २५ हजार रूपये खर्च झाले.
मात्र सिंचनाची सोय नसलयामुळे व एका पाण्यासाठी निसर्गाने धोका दिल्याने राऊत याचे हाती आलेले पीक गेले. ऐन निसण्याच्यावेळी धान वाळले. शेवटी झालेला खर्च वाया गेला. आज सकाळी राऊत यांनी या संपूर्ण अडीच एकरातील धानाला आग लावून टाकली. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.