शेतकरी वळला भाजीपाला पिकाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 09:47 PM2017-11-05T21:47:45+5:302017-11-05T21:47:57+5:30

धानपिक परवडणारे नसल्याची जाणीव शेतकºयांना झाल्याने भाजीपाल्याची शेती करण्याकडे कल वाढला असून मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांची शिष्टाई फळाला आली आहे.

The farmer turned the vegetable crop | शेतकरी वळला भाजीपाला पिकाकडे

शेतकरी वळला भाजीपाला पिकाकडे

Next
ठळक मुद्देमंडळ अधिकारी यांचे मार्गदर्शन : भाजीपाल्यातून आर्थिक उन्नतीचा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : धानपिक परवडणारे नसल्याची जाणीव शेतकºयांना झाल्याने भाजीपाल्याची शेती करण्याकडे कल वाढला असून मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांची शिष्टाई फळाला आली आहे. मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ३५ गावात प्रबोधन करीत हजारो एकरात भाजीपाल्याची शेती फुलत आहे.
पालांदूर परिसरात चुलबंद नदी खोरा व स्वतंत्र सिंचन क्षेत्रात यापूर्वी धान पीक खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात घेतले जात होते. मात्र शासकीय जाचक धोरणात सुधारणा न झाल्याने व उत्पादन खर्च वाढल्याने धान पीक कमी करुन भाजीपाल्याची शेती वाढली आहे.
मºहेगाव, नरव्हा, पाथरी, लोहारा, वाकल, ढिवरखेडा, पालांदूर, मचारणा, जेवनाळा, वाकल आदी गावात शेतकरी स्वत: उत्साहीत झाला असून त्यांच्या उत्साहाला मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके उभारी देत ड्रिप व मल्चिंग अनुदानावर देण्याचा शब्द दिला. शासन शेतकºयांप्रती उत्साही नसल्याने कित्येक धोरण फाईलबंद आहेत. भाजीपाला, दुध, अंडी, कुक्कुटपाल, पशुपालन क्षेत्रात शासनाने सकारात्मक प्रयत्न केल्यास शेतकºयांची प्रगती होण्यास मदत मिळेल.
पावसाळ्यात भाजीपाला उत्पादीत होऊ शकते असे ठामपणे कृषी कार्यालयामार्फत प्रबोधन करण्यात आल्याने शेतकरी एक पाऊल पुढे टाकत नव्या जोमाने भेंडी, वांगे, मिरची, कोबी, पालेभाज्या पिकविण्याच्या प्रयत्नाने सरसावले आहेत.

Web Title: The farmer turned the vegetable crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.