भारनियमनाविरूद्ध शेतकरी आंदोलन करणार

By admin | Published: January 28, 2017 12:34 AM2017-01-28T00:34:01+5:302017-01-28T00:34:01+5:30

मागीलवर्षी पावसाळ्यात कृषीपंपासाठी आठ तास वीज मिळत होती. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते.

Farmer's agitation against weightlifting | भारनियमनाविरूद्ध शेतकरी आंदोलन करणार

भारनियमनाविरूद्ध शेतकरी आंदोलन करणार

Next

लोकप्रतिनिधींना आश्वासनांचा विसर : शेतकरी संकटमोचन समितीचा आरोप
साकोली : मागीलवर्षी पावसाळ्यात कृषीपंपासाठी आठ तास वीज मिळत होती. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी या शेतकऱ्यांना आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता तीच आश्वासने लोकप्रतिनिधींनी पाळली नाहीत. परिणामी पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीने आयोजित पत्रपरिषदेत दिला.
पावसाळ्यात पावसाने दगा दिला दुसरीकडे आठ तास वीज पुरवठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाही. ज्यांची रोवणी झाली होती त्यांना विजेअभावी पाणी पुरत नव्हते. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा माराव्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. हे आंदोलन १० दिवस सुरू राहिले होते. शेवटी खासदार नाना पटोले व महावितरणचे अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन वीज पुरवठा ८ तासावरून १२ तास केला. पुन्हा चार तास वीज पुरवठा वाढवून देऊ, असे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन पुर्ण झाले नाही. ऐनवेळी निसर्गाने साथ दिल्यामुळे पीक घरी आले.
आता उन्हाळी पिकासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली. काही शेतकऱ्यांची रोवणी सुरू झाली. मात्र वीज आठ तासच मिळत आहे. त्यामुळे आठ तासाच्या विजेने पीक होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे त्यामुळे येत्या ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्रीसंत लहरीबाबा मठ साकोली येथे तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत शासनाने २४ तास वीज पुरवठा करावा व भारनियमन बंद करावे, धानाला ३ हजार पाचशे रूपये प्रती क्विंटल भाव द्यावा, आधारभूत धान खरेदी केंद्र आॅक्टोंबर महिन्याच्या सुरवातीला सुरू करावे, वन्य व हिस्त्रप्राण्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास २० लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात यावी, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागण्यावर चर्चा करण्यात येईल व शासनातर्फे या मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीचे साकोली तालुका अध्यक्ष राम महाजन यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अविनाश ब्राम्हणकर, डॉ.अजय तुमसरे, नंदकिशोर समरीत, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, मोतीराम कापगते, अशोक बोरकर, लीलाधर लांजेवार, गुलाब उके, देवराव कापगते, मारोती कापगते व बाबुराव बहेकार उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmer's agitation against weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.