केंद्रावरील धान उघड्यावर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

By admin | Published: December 24, 2015 12:30 AM2015-12-24T00:30:49+5:302015-12-24T00:30:49+5:30

चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस बरसला. सद्यस्थितीत ढगाळ वातावरण आहे.

The farmers of the center open the paddy fields at the center | केंद्रावरील धान उघड्यावर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

केंद्रावरील धान उघड्यावर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

Next

अवकाळी पावसाची भीती : खरेदी धानाला उचल नाही, निसर्गाची अवकृपा सुरुच
पालांदूर : चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस बरसला. सद्यस्थितीत ढगाळ वातावरण आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान्य आधारभूत केंद्रात उघड्यावर आहे. आधीच धान्य पिकले नाही. त्याचत पाऊस आला आणि धान्य भिजले तर कसे होईल, या विवंचनेत शेतकरी आहे.
लाखनी तालुक्यात पालांदूर परिसरात जाड धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अपुऱ्या सिंचन सुविधेमुळे १०१०, आरआय ६४, दप्तरी १२५ सारखी जाड वाणांची धान खरेदी केंद्रावर आवक वाढली आहे. अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे.
पालांदूर येथे सेवा सहकारी संस्थेअंतर्गत १९ नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरु करण्यात आली असून संस्थेच्या अखत्यारीतील दोन्ही कोठार भरलेले आहेत. यासाठी पालांदुरात दोन गोदाम भाडे तत्वावर घेण्यात आले असून त्याठिकाणी खरेदी सुरु आहे.
आतापर्यंत ७,७१६ क्विंटल धानाची खरेदी झाली असून जिल्हा सहकारी बँकेतर्फे हुंडी वटविण्यात आली आहे. याचे चुकारेसुद्धा देण्यात आले आहेत.
खरेदीतून ४० टक्के रक्कम पिककर्जाचे कापून उर्वरीत त्याच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. यामुळे पिककर्ज वसुलीला सहकार्य मिळत असले तरी याविषयी शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. पुढील वर्षापासून धान खरेदी गोदामअभावी कागदावरच राहणार असे चित्र आहे.
पालांदूर येथे धान खरेदी केंद्रासभोवती हजारो पोती उघड्यावर पडून आहेत. धानाचे नुकसान झाल्यास जबाबदार शेतकऱ्यांचीच राहनार असल्यामुळे धानाची मोजणी होईपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवात जीव नाही. रात्रीही शेतकऱ्यांच्या डोळ्याला झोप नाही. त्यांचे लक्ष आभाळाकडे न्याहाळत पाणी थेंबला की छातीत धक धक वाढते. शेवटे मिळेल ते आच्छान पोयावर आच्छादल्या जाते. रोजच मोजणीकरिता विचारणा करून आज उद्याच्या शब्दावर धान खरेदी सुरु आहे. (वार्ताहर)

धान खरेदीची अद्ययावत माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना कळविली जाते. खरेदी केलेल्या धान्याकरिता मागणी केली आहे. धान खरेदी सुरु असून गती देण्याचा प्रयत्न सुरु आहे. संस्थेच्या गोदामातील पडवीत धान पावसामुळे भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डी.ओ. मिळणे असल्याचे आहे.
- सुनील कापसे, गटसचिव,
सेवा सहकारी संस्था, पालांदूर.
चालू पिक कर्जाचे मुदत ३१ मार्चपर्यंत असते. त्यामुळे धानाच्या रकमेतून ४० टक्के रक्कम कापणे अयोग्य आहे. ३१ मार्चपर्यंत रब्बी पिकाच्या उत्पादनातून पिक कर्जाची सोय शेतकरी करतो. थकीत शेतकऱ्यांची पिककर्ज कापण्यास हरकत नाही. १०० दिवसापूर्वीच कर्ज वसुली कापू नये.
- वसंत बारई, शेतकरी, पालांदूर (चौ.)

Web Title: The farmers of the center open the paddy fields at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.