धान विक्रीअभावी शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 05:00 AM2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:21+5:30

तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तातडीने धान खरेदी करण्यात यावी, अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने तहसीलदार मल्लीक विराणी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Farmers in crisis due to shortage of paddy | धान विक्रीअभावी शेतकरी संकटात

धान विक्रीअभावी शेतकरी संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : धान खरेदी करण्याची मागणी, शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : शासन, प्रशासन शेतकऱ्यांच्या धान खरेदी संदर्भात नानाविध उपाययोजना केल्याचा दावा करीत असले तरी अद्यापही स्थिती याउलट आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तातडीने धान खरेदी करण्यात यावी, अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने तहसीलदार मल्लीक विराणी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भंडारा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून धान खरेदीला प्रांरभ करण्यात आला. मात्र खरेदी केंद्रावर सोयीसुविधांचा अभाव असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. जिल्ह्यातील अनेक केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगाचरांगा धान खरेदीसाठी लागल्या होत्या. आपला नंबर लागावा म्हणून चपलांचे टोकन ठेवले जात होते. शेतकऱ्यांचा आक्रोश बघता पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी धान खरेदी केंद्रावर असलेल्या अडचणी दुर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र आजही बहूतांश शेतकऱ्यांचा धान केंद्रावर पडून आहे.
लाखनी तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान आधारभुत धान खरेदी केंद्रावर अद्यापही पडून आहे. धान खरेदीपुर्णपणे झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनाद्वारे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले यांनी निवेदन देवुन धान खरेदी १८ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यावर धानाचे पैसे जमा करो. तसेच ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस १५ एप्रिलपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याबाबत वारंवार जनप्रतिनिधीशी व शासकीय यंत्रणेशी बोलुन सुध्दा शेतकºयांच्या बाबतीत सत्ताधारी विरोधी पक्ष पुर्णपणे बेभरोश्याचे राजकारण करीत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, असे निवेदनात संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले, सुधाकर हटवार, संजय रामटेके यांनी केले आहे.

धानाचे चुकारे अदा करण्याची मागणी
भंडारा जिल्ह्यात यावर्षी आधारभूत खरेदी केंद्रावर जवळपास २१ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला जिल्ह्यात प्रारंभ झाला. सुरुवातीला ६३ केंद्रावर खरेदी सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत पणन महासंघाच्या ८४ खरेदी केंद्रावर धान घेतला जात आहे. अनेक शेतकºयांचा धान आजही आधारभूत केंद्रावर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीपासूनच धान खरेदीत अनंत अडचणी आल्या. त्यातील पहिली महत्वाची अडचण म्हणजे गोदामाचा अभाव. तांदळाची उचल वेळेवर होत नसल्याने आजही गोदाम हाऊसफुल्ल आहेत. अनेक केंद्रावरील खरेदी महिनाभर बंद होती. बारदान्याची समस्याही कायमस्वरुपी दिसत होती. आता धान विक्रीसाठी अत्यल्प वेळ असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात धान घेऊन केंद्रावर पोहचत आहे.

Web Title: Farmers in crisis due to shortage of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.