शेतकरी कन्या सामूहिक विवाह काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:54 PM2018-04-02T23:54:35+5:302018-04-02T23:54:35+5:30

शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

Farmer's daughter collective marriage is the need of the hour | शेतकरी कन्या सामूहिक विवाह काळाची गरज

शेतकरी कन्या सामूहिक विवाह काळाची गरज

Next
ठळक मुद्देनाना पटोले : पवनी येथे सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने संताजी मंगल कार्यालय बेलघाटा वॉर्ड येथे आयोजित सर्वधर्मीय शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळा उद्घाटन समारंभाचे अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.
सोहळ्याचे उद्घाटन आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी नगराध्यक्षा पुनम काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा अर्बन को बँकचे संचालक विलास काटेखाये, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक किशोर पंचभाई, पंकज रेवतकर तर प्रमुख अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, नगरसेवक नरेश तलमले, प्रियंका जुमळे, शोभना गौरशेट्टीवार, निर्मला तलमले, अनुराधा बुराडे, वंदना नंदागवळी, डॉ. राजेश नंदूरकर, अ‍ॅड. लक्ष्मण देशमुख, देवा महाराज, दुधराम कळंबे, मोहन पंचभाई, अशोक पारधी, प्रशांत पिसे, राजेश राऊत उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले,शेतकरी कर्जमाफी प्रकरणाबाबत शासन गंभीर नसल्याचे आरोप करून नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी वैनगंगा नदीला सोडून स्वच्छ पाण्याला दूषित करण्याचे कृत्य निंदनीय आहे. दूषित पाणी वापरून शेतकरी कष्टाने कमावलेले पैसे वैद्यकीय उपचारावर खर्च करीत आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून शेतकºयांचे पाठीशी उभे राहिले पाहिजे.
सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाली. सर्व जोडप्यांना आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी शिलाई मशीन, पंकज रेवतकर यांनी बाथरूम संच व राजेश राऊत यांनी ग्रामगिता भेट दिली.
शेतकºयांचा वेळ व पैसा बचत करण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक मेळाव्यात करावे, असे आवाहन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रास्ताविक संयोजक राजेश तलमले यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर वाघमारे यांनी तर, आभार राजेश तलमले यांनी मानले. वºहांड्यासाठी उत्सव समितीच्या वतीने योजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.

Web Title: Farmer's daughter collective marriage is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.