सत्तेवर येताच शेतकऱ्यांना विसरले
By admin | Published: July 1, 2015 12:56 AM2015-07-01T00:56:41+5:302015-07-01T00:56:41+5:30
देशात वाढलेल्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे.
प्रफुल पटेल : सानगडी, सावरबंध, खांबा, एकोडीत सभा
साकोली : देशात वाढलेल्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. अच्छे दिन येणार असे स्वप्न दाखवून भाजपने केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. मात्र सत्ता येताच मोदी सरकारने महागाई वाढविली तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना धानाला भाव दिला नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. महाराष्ट्रातील जनता त्रस्त झाली आहे, असे मत खा. प्रफुल पटेल यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित सानगडी, सावरबंध, एकोडी व खांबा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आ. राजेंद्र जैन, बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, सदाशिव वलथरे, सुरेश कापगते, अंगराज समरीत, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, नरेंद्र वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे, हेमंत भारद्वाज, शारदा वाडीभस्मे, लता दुरूगकर उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, महाराष्ट्रातील जनता या सरकारमुळे त्रस्त आहे. या सरकारच्या प्रती जनतेत आक्रोष आहे. मोदी सरकारणे देशातून गरीबी हटविण्याचा वादा केला होता. मात्र तसे होताना दिसत नाही. युपीए सरकारच्या काळातील सर्व योजना बंद करण्यात आल्या. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोष मतांनी विजयी करण्याचे आवाहन पटेल यांनी केले. संचालन व आभार अंगराज समरीत यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)