बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Published: April 10, 2016 12:31 AM2016-04-10T00:31:57+5:302016-04-10T00:31:57+5:30

जास्त उत्पादन देणारी हंसा फुलगोबीचे बियाणे साहुली, दवडीपार येथील शेतकऱ्यांनी गणेशपूर येथील एका कृषी केंद्र खरेदी केले.

Farmers fraud by seed companies | बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

Next

भरपाईची मागणी : बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी
जवाहरनगर : जास्त उत्पादन देणारी हंसा फुलगोबीचे बियाणे साहुली, दवडीपार येथील शेतकऱ्यांनी गणेशपूर येथील एका कृषी केंद्र खरेदी केले. मात्र यात शेतकऱ्यांनी झालेले उत्पन्न बाजारात विक्रीसाठी नेले असता व्यापारी खरेदी करण्यास नकार दिला. सिडस् कंपनीने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
साहुली येथील शेतकरी विजय मांगो हटवार (२० पॉकेट), दिलीप पेशने (१० पॉकेट) व दवडीपार येथील राजेश राखडे (२ पॅकेट), मनोज राखडे (एक पॅकेट) यांनी गणेशपूर येथील कृषी केंद्रातून हेजीटेलब सेमीनस सिडस् कंपनीचे हंसा फुलगोबीचे बियाणे ५ नोव्हेंबर २०१५ रोजी खरेदी केले. याकरिता रोपवाटिका १० डिसेंबर २०१५ रोजी गादीवाफे पद्धतीने १.८ हे.आर. बियाणे टिपले. त्यानंतर २१ ते २५ दिवसांच्या आत ३ जानेवारी २०१६ रोजी हंसा फुलकोबीची लागवड केली. सदर बियाणे कंपनीचे एजंट द्वारे प्रमाणित औषध फवारणी स्प्रे केले. हंसा फुलगोबी हे पिवळा व मळकट तांबीर रंग असल्यामुळे ती बाजारात सदर शेतकऱ्यांनी विक्रीस नेले असता दलाल व व्यापारी यांनी ही फुलकोबी विकत नसल्याचे सांगितले. परिणामी शेतकऱ्यांनी बियाणे कृषी केंद्राकडे धाव घेतली. येथील विक्रेत्यांनी बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला असता याबाबत घटनास्थळी येण्याचे टाळत आहे. सदर बियाणे खरेदी केल्याप्रकरणी आपली फसवणूक झाली असल्याचे व झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्याची मागणी विजय हटवार, दिलीप पेशने यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Farmers fraud by seed companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.