किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:36 PM2017-10-25T23:36:17+5:302017-10-25T23:36:26+5:30

जिल्ह्यातील धान पिकावर सध्या तपकीरी तुडतुडे व पांढºया पाठीचे तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Farmers havoc on insects | किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल

किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील धान पिकावर सध्या तपकीरी तुडतुडे व पांढºया पाठीचे तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : जिल्ह्यातील धान पिकावर सध्या तपकीरी तुडतुडे व पांढºया पाठीचे तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करून नुकसान टाळावे, अशा सुचना कृषी संशोधन केंद्राने दिल्या आहेत.
तपकिरी तुडतुडे व पिल्ले धानाच्या बुंध्यावर आढळतात. ही जास्त नुकसान करणारी किड आहे. तुडतुडे व त्यांची पिल्ले ही झाडाच्या पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा पिवळया पडतात व नंतर झाड सुकून वाळते. शेतात ठिकठिकाणी किडग्रस्त भाताचे क्षेत्र गोलाकार करपलेले दिसते. यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. तुडतुडे तिरकस व भरभर चालतात. शेतात लांब पंखाचे भरपूर तुडतुडे खोडावर खालील बाजुस दिसून येतात. पांढºया तुडतुड्याचा प्रादुर्भाव तपकिरी तुडतुडयांच्या प्रादुर्भावाबरोबरच होतो. प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असल्यास चुडाचा बाहेरील पाने करपल्याने आढळतात.
धानावरील तुडतुड्याचे व्यवस्थापनासाठी इमिडॅक्लोप्रिड १७.८ एस.एल. २.२ मि.ली. किंवा फिप्रोनिल ५ एस.सी. २० मि.ली. किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्ल्यू जी २ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एकरी २५० लिटर द्रावण वापरावे. गरजेनुसार १५ दिवसानी पुन्हा एकदा वरीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. एकाच किटकनाशकाची फवारणी न करता किटकनाशक बदलून फवारणी करावी.
शेतात किटकनाशके फवारतांना सर्वसाधारणपणे पूढीलप्रमाणे काळजी घ्यावी. तीव्र द्रावण हातातळताना रबरी हातमोजे घालावेत. नाक व तोंडावर मास्क वापरावे. अ‍ॅप्रॉनचा वापर करावा. फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा. किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. फवारणीचे काम पुर्ण झाल्यावर झाल्यानंतरच हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे.उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी. असे कृषि संशोधन केंद्राचे वरिष्ठ भात पैदासकार, डॉ. जी.आर. शामकुवर व कनिष्ठ किटकतज्ज्ञ, डॉ.बि.एन. चौधरी यांनी कळविले आहे.

Web Title: Farmers havoc on insects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.