शेतकऱ्यांनो, आधुनिक शेतीची कास धरा

By admin | Published: January 5, 2016 12:36 AM2016-01-05T00:36:58+5:302016-01-05T00:36:58+5:30

वैज्ञानिक युगात पारंपरिक पध्दतीने शेती करणे परवडणारी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीचा विकास करावा,

Farmers, hold a new crop of modern farming | शेतकऱ्यांनो, आधुनिक शेतीची कास धरा

शेतकऱ्यांनो, आधुनिक शेतीची कास धरा

Next

बाळा काशिवार यांचे आवाहन : साकोलीत कृषी मेळावा-प्रदर्शनी
साकोली : वैज्ञानिक युगात पारंपरिक पध्दतीने शेती करणे परवडणारी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीचा विकास करावा, असे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने तालुका बीज गुणन प्रक्षेत्रात आयोजित शेती दिन व कृषी प्रदर्शनी कार्यक्रमात काशिवार बोलत होते. शेतात रासायनिक खते वापरल्याने जमीनीतील जिवाणू नष्ट होऊन जमिनीची सुपीकता नष्ट होते. व यामुळे उत्पादन क्षमतेत घट निर्माण झाली आहे. यासाठी शेतजमीनीत जिवामृत वापरण्याचे आवाहन करुन काशीवार यांनी बँकेद्वारे होत असलेली सक्तीची वसुली बंद करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, पंचायत समितीचे सभापती धनपाल उंदीरवाडे, तहसीलदार शोभाराम मोटघरे, खंड विकास अधिकारी शबाना मोकासे आत्माच्या प्रकल्प संचालिका प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, मंदा गणवीर, कार्यक्रमाध्यक्ष व कृषी भुषण रामचंद्र कापगते, उपविभागीय अधिकारी डी.पी. तलमले, कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे, डॉ. जी. आर. शामकुंवर, उप विभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, एस. पी. लोखंडे, यादवराव कापगते, मारोती चांदेवार, ए. एस. कुंभरे, जी. के. चौधरी, पं.स. सदस्या धनवंता राऊत, उषा डोंगरवार, पर्वते, वंजारी, मनीष कापगते, प्रभाकर सपाटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस व भात पिकावर विविध रोगाच्या प्रादुर्भावाने भात पिकांचे नुकसान झाले आहे. पण शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ घेऊन समस्या सोडवाव्यात.
याप्रसंगी डॉ. जी. आर. शामकुंवर, यशदीपसिंग गिरासे, डॉ. वंजारी, यादवराव कापगते यांच्याकडून शेतकऱ्यांना यथोचित मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी प्रदर्शनीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती विविध कंपन्यांद्वारे शेतीविषयक नवीन उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले होते. कृषी विभागाद्वारे शेती विषयी मार्गदर्शिका पोस्टर्स इत्यादी साहित्य व संकरित बी-बियो इत्यादी स्टॉल्स लावण्यात आले. पाहुण्यांनी कृषी प्रदर्शनीचे अवलोकन करुन प्रशंसा केली.कृषी मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते कृषी विषयक वार्षिक कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमासाठी चंदन मेश्राम, खोब्रागडे, साठवणे, श्रीकांत सपाटे व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. संचालन मोहाडीचे तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी तर आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी साकोली जी के. चौधरी यांनी केले. यावेळी तालुक्यातील शेतकरी, महिला शेतकरी, बचत गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कृषी मेळाव्याच्या अंतिम टप्प्यात खासदार नाना सपटोले यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित शेतकरी व अधिकारी यांच्याशी पटोले यांनी चर्चा करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांना शासकीय योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers, hold a new crop of modern farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.