धान चुकाऱ्याअभावी शेतकरी ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:00 AM2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:54+5:30
तुमसर तालुक्यातील मांढळ येथील शेतकरी विजय चौधरी आपली आपबिती सांगत होते, गत ७५ दिवसांपासून धानाचे चुकारे मिळाले नाही. बोनसचा पता नाही उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. पुढील महिन्यापासून नविन खरीप हंगामाची तयारी करावी लागणार आहे. शेतकºयांजवळ पैसा नाही. शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत करावी अशी विनवणी त्यांनी केली. सितासावंगीचे शेषराव तरटे म्हणाले, धान उत्पादक शेतकरी येथे चिंतेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : साहेब, घाम गाळून धान पिकविला, केंद्रावर धान विकण्यासाठी रात्ररात्र जागली, धानाचे पैसे येईल असे वाटत होते. तेवढ्यातच कोरोनाचे संकट आले. आम्ही घरात बंदीस्त झालो. घरात पैशाच्या सोय नाही आणि घाम गाळून पिकविलेल्या धानाचे दाम मिळत नाही. आता आम्ही जगावे तरी कसे? असे एकना अनेक सवाल धान उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहे. ‘लोकमत’ ने लॉकडाऊनमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धानाच्या चुकाऱ्या अभावी शेतकरी लॉकडाऊन झाल्याचे दिसून आले.
तुमसर तालुक्यातील मांढळ येथील शेतकरी विजय चौधरी आपली आपबिती सांगत होते, गत ७५ दिवसांपासून धानाचे चुकारे मिळाले नाही. बोनसचा पता नाही उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. पुढील महिन्यापासून नविन खरीप हंगामाची तयारी करावी लागणार आहे. शेतकºयांजवळ पैसा नाही. शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत करावी अशी विनवणी त्यांनी केली. सितासावंगीचे शेषराव तरटे म्हणाले, धान उत्पादक शेतकरी येथे चिंतेत आहे. अद्यापपर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही. धान खरेदी केंद्रावर पोते पडून आहे. बोनसही मिळाला नाही. या दोन प्रातिनिधी प्रतिक्रीया असल्यातरी जवळपास तुमसर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले. परंतु त्यापुढील अडीच महिन्यापासून उर्वरित शेतकºयांना चुकारेच मिळाले नाही. लोकप्रतिनिधीही गप्प आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवित आहे.
लाखांदूर तालुक्यातील मांदेडचे शेतकरी सदाशिव खेत्रे म्हणाले, कशीबशी उन्हाळी धानाची शेती करुन शेती केली. आता धानाची मळणी करणार आहो. मात्र गत हंगामात खरेदी केलेल्या धानाची शासनाने उचल केली नाही. गोदामे तुडूंब भरली आहे. यामुळे उन्हाळी धान खरेदी केव्हा सुरु होणार असा सवाल त्यांनी केला. चिंचोली येथील मोहनलाल सोनकुसरे म्हणाले, शासनाने प्राधान्याने चुकारे अदा करणे गरजेचे आहे. आगामी खरीप हंगामासाठी पैसाची सर्वांनाच चणचण आहे, असे ते म्हणाले.
महिन्याभरानंतर खरीपाचा नवीन हंगाम सुरु होणार आहे. लॉकडाऊनमुळे शेतकºयांच्या हातात पैसा नाही त्यामुळे नवीन हंगामाची मशागत व बियाण्यांची चिंता आजपासूनच शेतकºयांना सतावत आहे.
गोदाम फुल्ल, उन्हाळी धान खरेदीसाठी जागा नाही
पवनारा : तुमसर तालुक्यातील चिंचोली आधारभूत खरेदी केंद्रावर २४ हजार क्विंटल खरेदी झाली आहे. शासनाने आतापर्यंत सहा हजार क्विंटल धानाची उचल केली. आता उन्हाळी धान कापणीला प्रारंभ होईल. चिंचोली पवनारा, भोंडकी, जोगीवाडा, मोखेटोला, साकरी या परिसरात सहाशे एकारात धान लागवड करण्यात आली. खरीपातील धान उचलला नाही तर उन्हाळातील धान खरेदी कसा केला जाणार असा प्रश्न आहे.
दिघोरीत उन्हाळी धान मळणी सुरु
दिघोरी : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी परिसरात लॉकडाऊनच्या काळात उन्हाळी धान मळणीला सुरुवात झाली आहे. शासनाने धान खरेदी केंद्राचा शुभारंभ केला नसल्याने शेतकऱ्यांचा आपला धान खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागणार आहे. हा परिसर उन्हाळी धानासाठी प्रसिध्द आहे. परंतु अद्यापही उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. शेतकरी ललीतराम खंडाईत म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांची पिळवणूक करु नये, लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरु करावे. लाखांदूर खरेदी- विक्री संघाचे उपाध्यक्ष अरुण गभणे म्हणाले, शासनाने १ मे रोजी धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे पत्र दिले आहे. परंतु जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही सूचना किंवा आदेश दिला नाही.
खासगी व्यापाऱ्यांना कृषी माल विकण्याची वेळ
मोहाडी : गहू, हरभरा, तूर, लाखोरी अवकाळी पावसाने खराब झाली. तूरीला किड लागल्याने उत्पन्न कमी झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय वजनमाप करने बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करुन कृषी माल विकण्याची वेळ आली. व्यापारी कवडीमोल भावात माल खरेदी करीत असल्याचे मोहाडी येथील शेतकरी नत्थू हेडावु यांनी सांगितले. तर कृष्णा पराते म्हणाले, आधारभूत केंद्रावर विकलेल्या धानाचे पैसे मिळाले. परंतु बोनसची रक्कम मात्र अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे आम्ही जगावे तरी कसे?. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे शासनाने कृषी माल विकण्यास परवानगी दिली आहे. दुसरीकडे माल विकताना विविध परवानगी घ्यावी लागत आहे.