फळबाग योजनेतून मऱ्हेगावच्या शेतकऱ्याने शोधला प्रगतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:37 AM2021-05-08T04:37:29+5:302021-05-08T04:37:29+5:30

चुलबंद खोऱ्यात कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी एकनिष्ठ आहे. शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना ...

Farmers of Marhegaon found a way of progress through orchard scheme | फळबाग योजनेतून मऱ्हेगावच्या शेतकऱ्याने शोधला प्रगतीचा मार्ग

फळबाग योजनेतून मऱ्हेगावच्या शेतकऱ्याने शोधला प्रगतीचा मार्ग

Next

चुलबंद खोऱ्यात कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी एकनिष्ठ आहे. शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचविण्याकरिता पालांदूर मंडळ कृषी कार्यालय अख्ख्या जिल्ह्यात अग्रेसर आहे. नामदेव फुुुंडे हे शेतकरी बागायतीसह उन्हाळी धानाची शेती कसत आहे. यात कृषी विभागामार्फत अभ्यासाचा लाभ घेत विषमुक्त शेतीचे प्रात्यक्षिक यशस्वी केले आहे. आपल्या शेतात आठ आंब्याची झाडे लावलेली आहेत. झाडे फळांनी लदबदलेली आहेत. बांधावरील धुऱ्याच्या आधाराने पिकाचे नुकसान न होता आंब्याच्या झाडाची लागवड केलेली आहे. एक एकरात चार ते पाच झाडे व्यवस्थित अंतराने लागवड केलेली आहे. गत १० वर्षांपासून चुलबंद खोऱ्यातील आंब्यांना मोठी मागणी आहे.

कोट

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना व महात्मा गांधी रोजगार हमी योजनांतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर फळबागेचे नियोजन केले आहे. फणस, सीताफळ, पेरू, आंबा यासारखी फळझाडांची लागवड केलेली आहे. यात सर्वात जास्त ३९ हेक्टरवर आंबा पीक लागवडीखाली आलेले आहे. शेतकरीवर्गाला यातून अपेक्षित मोबदला अर्थात उत्पन्न मिळत आहे.

गणपती पांडेगावकर, मंडळ कृषी अधिकारी पालांदूर

आंब्याची शेती निश्चितच फायदेशीर ठरली आहे. वर्षाकाठी दीड एकरातून फळांच्या क्षमतेनुसार ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न हमखास मिळते. घरीसुद्धा खायला मुबलकता येते. फळांसह सावली, शुद्ध हवासुद्धा मिळत असल्याने शेतीत फळझाडे अनमोल ठरलेली आहेत.

नामदेव फुंडे,

प्रगतशील शेतकरी, मऱ्हेगाव

Web Title: Farmers of Marhegaon found a way of progress through orchard scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.