शेतकऱ्यांना मार्गदर्शन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:40 PM2018-01-09T23:40:09+5:302018-01-09T23:40:43+5:30
शेतशिवारात लागवड करण्यात आलेल्या भाजीपाला आणि कडधान्यावर वातावरणात वारंवार बदल होत असल्याने किडीचा वाढता प्रादुर्भाव आहे.
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : शेतशिवारात लागवड करण्यात आलेल्या भाजीपाला आणि कडधान्यावर वातावरणात वारंवार बदल होत असल्याने किडीचा वाढता प्रादुर्भाव आहे. किडीपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारची अवाढव्य औषधांची फवारणी करण्यात येत असल्याने विपरीत परिणाम शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. किडीपासून भाजीपाला व अन्य कडधान्याचे योग्य औषधांची फवारणी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक के.बी. तरकसे यांनी केले.
बोरी येथे कृषीदिन व किड नियंत्रण आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक बँक अर्थसहाय्यीत, कृषी विकास प्रकल्प आणि सर्वज्ञ विकास शेतकरी उत्पादक कंपनी मांडवी यांचे संयुक्त विद्यमाने कृषी दिन आणि कीड नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक के.बी. तरकसे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ डॉ.एस.के. राखडे, डॉ.मोहोड, कृषी पणनतज्ज्ञ योगेश खिराडे, तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके, विशाल पशिने, सरपंच अविनाश उपरीकार, उमरवाडाचे सरपंच नंदलाल गुर्वे, कोष्टीचे सरपंच अनुसया पंचबुद्धे, उपसरपंच अरविंद शिंदे, जैपाल विठुले उपस्थित होते. आयोजित कृषी दिन व कीड नियंत्रण सप्ताहाचे कार्यक्रमात कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांनी शेतकºयांनी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सल्ले आणि योग्य मार्गदर्शन शेतीविषयक संदर्भात घेत राहावे. या शिवाय शेत शिवारात विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. असे मार्गदर्शनात माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे विकासाकरिता शासनस्तरावर अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना थेट शेतकऱ्यांचे दारात पोहचली पाहिजे अशी माहिती कृषीतज्ज्ञांनी दिली.
या कार्यक्रमात बोरी, उमरवाडा, कोष्टी, मांडवी, परतवाडा, रेंगेपार, पांजरा, तामसवाडी, सितेपार येथील शेतकरी सहभागी झाले. कार्यक्रमाला कृषी सहाय्यक खंडाईत, विणा पडारे, भास्कर सोनवाने, मंगेश समरीत, वळवी, आर.आर. मलेवार, प्रमोद तितीरमारे, महेंद्र मेश्राम, जयप्रकाश मेश्राम, विजय मेश्राम, वर्षा मते, जितेंद्र मेश्राम, विरेंद्र मेश्राम यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक नत्थूलाल शरणागत यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन महेंद्र मेश्राम यांनी केले.