शेतकऱ्यांनी उत्पादन व पिकांच्या उत्पादकतेतील दरी कमी करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:27+5:302021-03-24T04:33:27+5:30

तालुक्यातील नवेगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बात पड क्षेत्रांमध्ये कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अनिल बुरडे यांच्या शेतावर आयोजित शेती ...

Farmers need to reduce the gap between production and crop productivity | शेतकऱ्यांनी उत्पादन व पिकांच्या उत्पादकतेतील दरी कमी करण्याची गरज

शेतकऱ्यांनी उत्पादन व पिकांच्या उत्पादकतेतील दरी कमी करण्याची गरज

Next

तालुक्यातील नवेगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बात पड क्षेत्रांमध्ये कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अनिल बुरडे यांच्या शेतावर आयोजित शेती दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे मंडळ कृषी अधिकारी दीपक आहेर, कृषी पर्यवेक्षक विजय हुमणे, उपसरपंच विनोद जगनाडे, पोलीस पाटील प्रकाश तितिरमारे, कृषी सहायक आनंद मोहतुरे, गिरिधारी मालेवार, विकास मुळे, केदार उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणानुसार आधुनिक शेतीचा अवलंब करून शेडनेट, पॉलिहाऊसमध्ये भाजीपाला पिके तसेच अन्य पिकांचे उत्पादन घेण्याची गरज असून विविध योजनांची माहिती देत एकात्मिक शेती राबवण्याचे आवाहन केले.

भंडारा मंडळ कृषी अधिकारी दीपक आहेर यांनी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे योजनांचा एकत्रित लाभ मिळणार असल्याचे सांगितले. यासाठी शेतकऱ्यांनी

शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले. कृषी सहायक आनंद मोहतुरे यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध साधन सामुग्री आणि बदलत्या हवामानानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये कसा गरजेचा बनला आहे त्यानुसार वाढलेला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून शेतीला पूरक जोडधंदा सुरू करण्याचे आवाहन केले. शेतकरी दिनासाठी नवेगाव येथील शेतकरी अनिल बुरडे, मुकुंदा मारवाडे, भास्कर बुरडे,सुनील टांगले, मयूर बुरडे, रोशन चव्हाण, नांगो मारवाडे, फुलचंद बुरडे, शांताराम बाभरे, संजय बोंदरे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. संचालन कृषी सहायक आनंद मोहतुरे यांनी केले तर आभार कृषी सहायक केदार यांनी मानले.

बॉक्स

शेडनेट, पॉलिहाऊस उभारण्याची गरज

वर्षानुवर्ष हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहेत. विविध ऋतूंमध्ये अनेकवेळा वेळी-अवेळी पाऊस पडतो. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण निसर्गाला थांबू शकत नाही. मात्र बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी स्वतः मध्ये बदल करीत नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर, कोल्हापूरसारख्या भागात मोठ्या प्रमाणात उभारलेल्या पॅक हाऊस,शेडनेट, पॉलिहाऊसमध्ये फुलवलेल्या शेतीप्रमाणे आपणही पॉलिहाऊस उभारण्याची गरज असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Farmers need to reduce the gap between production and crop productivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.