कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By Admin | Published: March 17, 2017 12:31 AM2017-03-17T00:31:04+5:302017-03-17T00:31:04+5:30

परिसरातील कांदा उत्पादकांनी मागीलवर्षी बसलेला फटका लक्षात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ

Farmers' roll over to the onion product | कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

googlenewsNext

खर्च जास्त उत्पन्न कमी : कवडीमोल भावात विक्री
चिचाळ : परिसरातील कांदा उत्पादकांनी मागीलवर्षी बसलेला फटका लक्षात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ फिरविल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवनी तालुक्यात चिचाळ येथे मोठ्या प्रमाणात खरीप पीक निघल्यानंतर नगदी पीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र कांदा उत्पन्नावर निसर्गाची अवकृपा किटकनासक औषधी, रासायनिक खते आदी खर्च आवाक्याबाहेर होतो. वादळ पावसाचा तडाखा तर कधी रानडुकरांच्या हैदोसाने शेतकरी भरडला जातो. गेल्यावर्षीला चिचाळ येथे ८०० ते ९०० एकरात उत्पन्न घेतले होते. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही मिळाल्याने किंवा शासकीय आधारभूत केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना पडक्या भावात विक्री करावी लागली. काहींनी पडक्या भावात कांदा विकला खरा मात्र व्यापारी कांद्याचा ‘स्टॉक’ करून मालामाल झाला. त्यामुळे या वर्षाला बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा ऐवजी उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले. चिचाळ शेतशिवारातून जाणाऱ्या मुख्य डाव्या कालव्यालगत शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी शेतीची मशागत करून शेती सज्ज केली होती. मात्र गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे कामे सुरू असल्याने कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही.
खर्च जास्त उत्पादन कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गडद छायेत फसला गेला. या जगाच्या पोशिंद्याला कर्जाच्या बेडीतून काढणार कोण, शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार असे अनेक प्रश्न बुद्धीजीवी करित आहेत. पवनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची मोठी कंपनी नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले गाव सोडून शहराकडे जात असतात. शेती व्यवसाय नेहमीच तोट्याचे असल्याने शेतीकडे नवीन पिढीचा कल बदलल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. कांद्याचा भाव कमी असल्याने मजुर, गाडीभाडा यामध्येच शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असतात. बळीराजाच्या समस्या शासन दरबारी लावून धराव्यात पवनी तालुक्यात एमआयडीसी प्रोजेक्ट कारखानदारी छोटे, मोठे शेतीला पुरक उद्योग धंदे आणावे लागतील तरच तालुक्यातील शेतकरी सुखावेल. (वार्ताहर)

Web Title: Farmers' roll over to the onion product

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.