शेतकऱ्यांनी प्रचलित धानाची लागवड करावी
By admin | Published: June 17, 2016 12:40 AM2016-06-17T00:40:00+5:302016-06-17T00:40:00+5:30
कमी पैशात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच भातपिकाची लागवड करतांना शेतकऱ्यांनी शिफारसीत (प्रचलित) जातीच्या धानाची लागवड
शामकुवर यांचे आवाहन : शेतकऱ्यांना मार्गदर्शन
साकोली : कमी पैशात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच भातपिकाची लागवड करतांना शेतकऱ्यांनी शिफारसीत (प्रचलित) जातीच्या धानाची लागवड करावी असे आवाहन डॉ. जी. आर. शामकुवर वरिष्ठभात पैदासकार कृषी संशोधन केंद्र साकोली यांनी केले आहे.
मागील वर्षी खरीप हंगाम २०१५ मध्ये भंडारा जिल्ह्यात भात पिकावर निरनिराळ्या किडी व रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. यामध्ये गादमाशीच्या प्रादुर्भाव ५ ते ७० टक्के पर्यंत, खोउकिडीचा प्रादुर्भाव १५ ते ६० टक्केपर्यंत, पांढऱ्या पाठीचे तुडतुडे १५ ते २० प्रती चुड, तपकीरी तुडतुडे १० ते ३० प्रती चुड आढळला होता. तसेच रोगामध्ये पानावरील करपा ४ ते ६० टक्के पर्यंत, कडकरपा ५ ते ३० टक्केपर्यंत पर्णकोब करपा २ ते १५ टक्केपर्यंत, पर्णकोष कुजण्या ५ ते १५ टक्केपर्यंत आदी मानगोडी १५ ते २० टक्के पर्यंत, तपकिरी ढिपके ३ ते ५ टक्के, काजळी १ ते ३ टक्केपर्यंत आढळले. त्याचप्रमाणे प्रथमत:च पान व पर्णकोषातील कोळी तथा लोंबीवरील कोळी या नविन किडीचा प्रादुर्भाव आढळून आला. दरवर्षी भात पिकावर किडी व रोगाचे प्रभाव वाढत आहे. याला वातावरणातील बदल ढगाळ वातावरण हे घटक कारणीभूत असले तरी दिवसेंदिवस अतीशय बारीक जातीची लागवड मोठ्या प्रमाणात होते व शिफारसीत जातीची लागवड कमी प्रमाणा होते. कारणीभूत आहे. भाताच्या वेगवेगळ्या बारीक जाती वेगवेगळ्या किडीना व रोगांना बळी पडणाऱ्या आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम २०१६ मध्ये कृषी विद्यापिठानी शिफारसीत केलेल्या भात जातीची लागवड करणे हिताचे आहे. त्यामुळे फवारणीवर होणारा खर्च काही प्रमाणात कमी करता येईल व उत्पादन सुध्दा समाधानकार मिळेल. कृषी विज्ञान केंद्र साकोली व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथून धानाच्या वेगवेगळ्या जातीची लागवडीसाठी शिफारस केली आहे. व त्याचे बियाणेसुध्दा विक्रीसाठी कृषी संशोधन केंद्र नवेगावबांध, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही, कृषी संशोधन केंद्र तारसा येथे उपलब्ध आहेत. शिफारस केल्या भाताच्या जातीमध्ये पीकेव्ही, एचएमटी, पीकेव्ही किसान, पिकेव्ही गणेश, साकोली ३०-३९, सिंदेवाही २००१, सिंदेवाही ५, सिंदेवाही१, पिकेव्ही शेषराव पिकेव्ही मकरंद व साकोली ९ यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी शेतक-यांनी कृषि संशोधन केंद्र साकोली येथे संपर्क साधावा असे आवाहन डॉ. शामकुंवर यांनी केले आहे.