शेतकºयांनी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:14 AM2017-09-02T00:14:02+5:302017-09-02T00:14:32+5:30
निसर्गाच्या बदलत्या युगात शेतीत नवनवे प्रयोग करणे गरज आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होत असून शेतकºयांनी......
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : निसर्गाच्या बदलत्या युगात शेतीत नवनवे प्रयोग करणे गरज आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होत असून शेतकºयांनी पारंपारिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीमध्ये प्रयोग करावेत व उत्पन्न दुप्पट होईल अशा पध्दतीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र व आत्मा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने साकोली येथे आयोजित संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. परिणय फुके होते. तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, तहसीलदार अरविंद हिंगे, नवेगाव नागझिरा प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंद्रु पाठक, विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे, गटविकास अधिकारी तडस, उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे, तालुका कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार, चौधरी, गेडाम व योगेश खिराळे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संकल्प ते सिध्दी कार्यक्रमांतर्गत शेतकºयांनी सामुहिक शेतीचा संकल्प करुन गावनिहाय नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संकल्पाबरोबरच पुरक व्यवसायाची साथ दिल्यास शेती उत्पन्नास वाढ होईल असे सांगून खासदार म्हणाले की, तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती अधिक फायदेशिर ठरु शकते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले की, पावसाचे दिवस कमी झाल्याने शेतीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात अधिक उत्पादन हे सुत्र विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. या दृष्टीने केंद्र सरकार पावले उचलत असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली शेती फायदेशिर ठरु शकते.
उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे, अपघात विमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व इतर योजनांची माहिती दिली.
कृषी पणन तज्ज्ञ यांनी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सादरीकरणाद्वारे उपस्थित शेतकºयांना सात सुत्री कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाºया कृषीभूषण शेतकरी शेषराव निखाडे, मंदाबाई गावळकर या शेतकºयांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच आत्मा अंतर्गत गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी भंडारा व नवचैतन्य शेतकरी उत्पादक कंपनी, धारगाव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शेतकºयांना तंत्रज्ञानाची माहिती होण्याकरीता कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र साकोली, आत्मा भंडारा, सप्तरंगी शेतकरी उत्पादक कंपनी विरलीखंदार आदींनी सहभाग घेतला होता.