शेती शाळेतून शेतकऱ्यांनी धान पिकाची परिपूर्ण माहिती घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:12+5:302021-08-28T04:39:12+5:30

तालुक्यातील खैरी येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शेतीशाळेसाठी लाखनीचे कृषी पर्यवेक्षक गणेश शेंडे, कृषी ...

Farmers should get complete knowledge of paddy crop from agricultural school | शेती शाळेतून शेतकऱ्यांनी धान पिकाची परिपूर्ण माहिती घ्यावी

शेती शाळेतून शेतकऱ्यांनी धान पिकाची परिपूर्ण माहिती घ्यावी

Next

तालुक्यातील खैरी येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शेतीशाळेसाठी लाखनीचे कृषी पर्यवेक्षक गणेश शेंडे, कृषी सहायक गोपाल मेश्राम, अजय खंडाईत यांच्यासह गावातील शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शेतीशाळेबाबत महत्त्वाच्या सूचना देत शेती शाळेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी पात्रीकर यांनी केले.

यावेळी कृषी पर्यवेक्षक गणेश शेंडे यांनी शेतीशाळेत शेतकऱ्यांची गटांमध्ये विभागणी करून गटातील प्रशिक्षणार्थींनी त्यांचे गटाचे गट प्रमुखांची निवड केली. काही गटांना प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये तर उर्वरित गटांना कंट्रोल पारंपरिक पद्धतीचे प्लॉटमध्ये परिसंस्थेची निरीक्षणे घ्यावयास लावली. यात पहिल्यांदा शेतकरी प्रशिक्षणार्थींना शेतामध्ये गेल्यानंतर कोणती निरीक्षणे घ्यावयाची आहेत, याविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर कृषी सहायक गोपाल मेश्राम यांनी शेतकऱ्यांना निरीक्षणे घेताना शेतकऱ्यांना धानाच्या बांधीत उतरुन धानाच्या चुडांची संख्या, फुटवे प्रती चूड, भात पिकाची उंची, पिकामधील रोग व कीडीची निरीक्षणे, शेतातील मित्रकिडी, पिकाची सर्वसाधारण परिस्थितीबाबत निरीक्षणे, शेतातील पाण्याचे प्रमाण, तणाचे प्रमाण, पिकाचा रंग व वाढ, शेतामधील निरीक्षणानंतर आढळलेल्या बाबींचा व रोग कीडींवरील उपाययोजनांची माहिती दिली.

बॉक्स

फळबाग लागवडीचे आवाहन

लाखनी तालुक्यात फळबाग लागवडीचे क्षेत्रात वाढ झाली आहे. याचे येत्या काही वर्षात फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, तसेच एका पिकावरच अवलंबून न राहता बहुपीक पद्धतीचे शेतकऱ्यांना फायदे प्रत्यक्ष समजतील. जिल्ह्यात सर्वाधिक फळबाग लागवड केलेल्या कृषी सहायक गोपाल मेश्राम यांचा पालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. या सत्कार प्रसंगाची आठवण करून देताना भविष्यात फळबाग लागवडीतूनच शेतकरी स्वयंपूर्ण होतील व पारंपरिक धान शेतीऐवजी फळबाग लागवड अधिक क्षेत्रात वाढवण्याचे कृषी सहायक गोपाल मेश्राम यांनी शेतीशाळेतून उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.

Web Title: Farmers should get complete knowledge of paddy crop from agricultural school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.