शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:09+5:302021-08-28T04:39:09+5:30
रुपेश नागलवाडे : लाखनी तालुक्यातील कनेरी येथे सभा पालांदूर : पारंपरिक पिके शेतकऱ्यांच्या उद्धार करण्यास असमर्थ ठरले आहेत. तेव्हा ...
रुपेश नागलवाडे : लाखनी तालुक्यातील कनेरी येथे सभा
पालांदूर : पारंपरिक पिके शेतकऱ्यांच्या उद्धार करण्यास असमर्थ ठरले आहेत. तेव्हा काळानुरूप बदलत औषधी गुण असलेले व बाजारपेठेत मागणी असलेले लेमन ग्रास लागवड करून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन रुपेश नागलवाडे कनेरी तालुका लाखनी यांनी शेतकऱ्यांना केले. ते पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत कनेरी येथील शेतकऱ्यांच्या सभेत बोलत होते.
मार्गदर्शक म्हणून श्लोक येरावार, निखिल लोथे, खरेदी-विक्री संस्थेचे सभापती घनश्याम खेडीकर, नानाजी ईलमे आदी उपस्थित होते. शेतकरी वर्गात अनवर सपाटे, राजेंद्र तिबुडे, प्रवीण तवाडे, केवळराम बोंद्रे, अमर राघोर्ते, शंकर ठवकर मचारना,नरेश टीचकुले, भास्कर लांजेवार, अमोल मते, लोकेश सेलोकर, हेमंत सेलोकर, भागवत भुरे, भेनाथ मोहतुरे, नरहरी नागलवाडे, अशोक बांते, प्रकाश लांजेवार, प्यारेलाल झलके, संजय नागलवाडे, कोमल नागलवाडे, निखिल नागलवाडे, इत्यादी शेतकरी उपस्थित होते. शेतकरी नरहरी नागलवाडे यांनी प्रास्ताविक सादर करून उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.