शेतकऱ्यांनी कमी खर्चाची पीक लागवड करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 09:25 PM2019-03-17T21:25:37+5:302019-03-17T21:26:23+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकºयांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकऱ्यांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
सेंद्रीय शेती विषमुक्त उत्पादन व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम एजिवासू प्रोडक्ट व वेस्ट क्यारिअर वेस्ट डिलच्या विद्यमानाने घेतलेल्या कार्यक्रमाला जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख, जिल्हा विधी सेवाचे सचिव कोठारी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बानवाले, संजय एकापुरे, गौरीशंकर डोहळे, शेखर तिवारी, प्रभात मिश्रा, सतीष गाढवे, जयशंकर घटाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सिहोरा येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. संजय देशमुख यांनी सिहोरा येथे नैसर्गिक शेतीकरिता मार्गदर्शन करताना शेतकरी बंधूंनी बियाणे, कीटकनाशके, खत घरीच तयार करून शेती करण्याचे आवाहन केले. आज शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहे. कोणीही शेती करण्यासाठी तयार नाही. कारण रासायनिक खते कीटकनाशके व बियाणे मजुरी वा खर्च उत्पादन च्या तुलनेत जास्त आहे. जीवामृत बिजामृत कीटकनाशके (ब्रम्हास्त्र, अग्नी अस्त्र) कसे बनवावे हे शेतकरी बंधूंना समजावून सांगितले व सर्व शेतकरी बंधूंना पत्रके देून सदैव तुमच्या सहकार्याकरिता आश्वासन दिले. गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष संजय एकापुरे यांनी शेतकरी बंधूंना भरपूर उत्पन्न घेण्यापेक्षा विषमुक्त उत्पन्न घेऊन सृदृढ भारत निर्मिणी करणे काळाची गरज आहे. देशी गाय प्रत्येक शेतकरी बंधूंच्या घरी असलीच पाहिजे व घरी सर्वांनी दुधाचे सेवन करून शेण व गोमुत्रापासून १० एकर शेती करू शकतो असे आवाहन केले. जर्सी व होलेस्टीनच्या गाईचा दुधाचा वापर टाळण्याचे आवाहन केले. विषमुक्त अन्न पिकवून देशात व विदेशात आपले धान्य विक्रीसाठी पाठविण्यासाठी दर्जेदार माल तयार करण्यास सांगितले. शेखर तिवारी यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करून कमी खर्चात शेती करून दाखवू असे आवाहन केले.