निर्यातक्षम दर्जेदार शेती उत्पादन शेतकऱ्यांनी करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:39+5:302021-03-04T05:06:39+5:30

बीटीबी किसान प्रोडुसरच्या लोकार्पण प्रसंगी बोलत ते होते. कार्यक्रमाला विभागीय कृषी अधीक्षक अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद ...

Farmers should produce exportable quality agricultural produce | निर्यातक्षम दर्जेदार शेती उत्पादन शेतकऱ्यांनी करावे

निर्यातक्षम दर्जेदार शेती उत्पादन शेतकऱ्यांनी करावे

Next

बीटीबी किसान प्रोडुसरच्या लोकार्पण प्रसंगी बोलत ते होते. कार्यक्रमाला विभागीय कृषी अधीक्षक अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे, पौर्णिमा बारापात्रे, कृषी अधिकारी विकास चौधरी, आयसीआयसीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रंजनकुमार, कृषी तज्ज्ञ सुधीर धकाते, नगरसेवक संजय कुंभलकर, लहानशा नंदुरकर, अतुल मानकर, रवी राऊत, कृष्णा उपरीकर, दीपक पराते, इमरान शेख, मंगेश राऊत, तानाजी गायधने, अजय सार्वे, प्रकाश मस्के, उमेश गरपडे, नाजूक गायधने, नानाजी कारेमोरे, नारायण धर्मशाहारे, बिरजू खराबे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना भविष्यात चांगले दिवस मिळावे या उद्देशाने बीटीबी किसान प्रोडुसरची स्थापना केलेली आहे. शेतकरी हा एकत्रित यावा. त्याच्या उत्पादनाला उत्कृष्ट दर्जा मिळावा. खुल्या अर्थव्यवस्थेत त्याचा सहभाग व्हावा. सर्वाधिक भाव मिळावा. निर्यात धोरणात सहभाग व्हावा. त्याने उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगती साधावी, हा प्रयत्न असल्याचे बंडू बारापात्रे यांनी सांगितले. प्रास्ताविक सुधीर धकाते यांनी तर सूत्रसंचालक तानाजी गायधने केले. आभार संजय कुंभलकर यांनी मानले.

बॉक्स

शेतकऱ्यांना सहकार्य करणार

बीटीबी शेतकरी उत्पादक कंपनीला स्मार्ट योजनेअंतर्गत लाभ देऊन कंपनीचे बळकटीकरण करण्यात येईल. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येईल. तसेच जिल्ह्यात स्थापन झालेल्या इतर कंपन्या प्रक्रिया उद्योगासाठी पुढे आल्या असून, त्यांनाही इस्मार्ट योजनेचा लाभ देण्यात येईल. निर्यातक्षम धोरण आखत शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल, असे कृषी विभागाच्या वतीने या वेळी सांगण्यात आले.

Web Title: Farmers should produce exportable quality agricultural produce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.