कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:58+5:302021-02-20T05:40:58+5:30

शेतकऱ्यांनी सेवा सुविधा केंद्र तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रातून महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन आपला सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँक ...

Farmers should upload documents for agricultural schemes | कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करावे

कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करावे

googlenewsNext

शेतकऱ्यांनी सेवा सुविधा केंद्र तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रातून महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन आपला सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँक पासबुक, टेस्ट रिपोर्ट, ट्रॅक्टरचलित यंत्र असल्यास आरसी बुक संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहे. विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ११ जानेवारी २०२१ पर्यंत अर्जासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली होती. ऑनलाईन लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी नवीन विहीर, कांदा चाळ, प्लॅस्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचनविषयक योजनांचा समावेश केला आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी महाआयटी. या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी योजना यावर क्लिक करून वापरकर्ता आयडीवर क्लिक करून वापरकर्ता आयडी व पासवर्ड व त्याखालील प्रतिमेत दर्शविलेल्या शब्दावरून लॉगिनवर क्लिक केल्यास प्रोफाइल स्थिती पृष्ठावर मुख्य मेनूमधील मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यावरण क्लिक करून त्यानंतर ॲप्लाइड घटकामध्ये छाननीअंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यास अपलोड डॉक्युमेंट अंडर स्क्रुटीनी असा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे, असे शेतकऱ्यांनी समजावे. यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात जाण्याची गरज नसून या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे ऑनलाईन चार दिवसांत अपलोड करावयाचे आहेत.

जिल्हा कृषी विभागातर्फे तालुकास्तर तसेच ग्रामीणस्तरावर शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे. काही अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. ऑनलाईन लॉटरीची पद्धत राज्यस्तरावरून राबविण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन लॉटरी पद्धत ही अतिशय जलद व पारदर्शक पद्धतीने होत आहे. शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करताना किंवा काही तांत्रिक समस्या आल्यास कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी अथवा जिल्हा कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी योगेश मेहर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कागदपत्रे अपलोड करताना या गोष्टी करा

शेतकऱ्यांना अपलोड डॉक्युमेंट अंडर स्क्रुटीनी असा शेरा ज्या घटकासमोर आहे. तेथे लॉटरीसाठी निवड झाल्याचे कळते. त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक करून तेथे स्क्रीनवरील कागदपत्रे अपलोड करा. यावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावे. क्लिक करताच अपलोडिंगची स्क्रीन दिसते. त्यात नमूद केलेली कागदपत्रे अपलोड करताना ती १५ ते पाचशे केबी या आकारमानातच ठेवावी लागणार आहे. अपलोडिंग पूर्ण होण्यासाठी जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यास सर्व प्रक्रिया अपलोडिंगची प्रक्रिया पूर्ण होते.

कोट

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना कृषी विभागाचा ऑनलाईन लॉटरी लागल्याचा एसएमएस आला आहे. त्या सर्व शेतकऱ्यांनी सातबारासह आपली आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्वरित महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन अपलोड लवकर करायची आहेत. यात अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा.

Web Title: Farmers should upload documents for agricultural schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.