पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा रात्रभर शेतशिवारात जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:24 AM2021-07-11T04:24:14+5:302021-07-11T04:24:14+5:30

बॉक्स शेतकऱ्यांच्या जिवावर बेतू शकते शेत शिवारात आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी अनेक शेतकरी दिवसा, रात्री राखण करीत आहेत. ...

Farmers stay awake all night to protect their crops | पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा रात्रभर शेतशिवारात जागर

पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा रात्रभर शेतशिवारात जागर

Next

बॉक्स

शेतकऱ्यांच्या जिवावर बेतू शकते

शेत शिवारात आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी अनेक शेतकरी दिवसा, रात्री राखण करीत आहेत. दिवसा, रात्री या पिकांचे संरक्षण करताना काही वेळा रानडुक्कर प्राणी हल्ला करू शकतो. अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही घडली आहेत. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून पिकांचे रक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसान करणाऱ्या रानडुक्कर या प्राण्याला वन्यप्राण्यांच्या यादीतून वगळण्यात यावे, अशीही मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बॉक्स

तत्काळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

शेतशिवारात रात्री अंधाराच्या वेळी हरणांचे मोठे कळप, रानडुक्कर पिकांवर तुटून पडत आहेत. एका कळपात ४० ते ५० हरीण राहत असल्याने एखाद्या शेतात ते पोहोचताच पूर्ण पीकच फस्त करून टाकत आहेत. त्यामुळे कोवळ्या पिकांची पाने, तुरीचे शेंडे खात असल्याने पुन्हा पेरणी करता येणार नाही. याउलट पिकाची वाढ झाली तरीही उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे तत्काळ वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. कोट

खरबीसह चिखली, खराडी शेतशिवारात सोयाबीन, तूर पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परिसरातील पिके चांगली उगवली असून, रानडुक्कर, हरणांचे कळप या कोवळ्या पिकांवर तुटून पडत आहेत. कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आधीच वाढ झाली असल्याने वनविभागाने तत्काळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून शासकीय मदत द्यावी.

संजय आकरे, उपसरपंच, खरबी नाका

Web Title: Farmers stay awake all night to protect their crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.