भंडारा जिल्ह्यात सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:49 PM2018-10-01T13:49:23+5:302018-10-01T13:52:07+5:30

पावसाने दडी मारल्याने धान पीक वाळत असून पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडावे, या मागणीसाठी शेतकºयांनी भंडारा- तुमसर राज्यमार्गावर सोमवारी १२ वाजतापासून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

farmers Stops road traffic for irrigation water in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको

भंडारा जिल्ह्यात सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको

Next
ठळक मुद्देवरठी येथे दोन तासापासून ठिय्यामहिलांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाने दडी मारल्याने धान पीक वाळत असून पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भंडारा- तुमसर राज्यमार्गावर सोमवारी १२ वाजतापासून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
मोहाडी तालुक्यातील सुमारे चार हजार हेक्टर धान पीक धोक्यात आले आहे. पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे, मात्र पेंच प्रकल्पाचे पाणी सोडले जात नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वरठी येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले. राष्ट्रवादीचे नेते राजू कारेमोरे, माजी सभापती कमलेश कनोजे, नेरीचे सरपंच आनंद मलेवार, वरठीच्या सरपंच श्वेता येळणे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झाले. शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरल्याने राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तहसीलदार सूर्यकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पेंच प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी नितीन सोनटक्के यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत आहेत. मात्र, शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

Web Title: farmers Stops road traffic for irrigation water in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.