राज्य सरकारच्या दुटप्पी वागणुकीने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:15+5:302021-06-30T04:23:15+5:30
कोट खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध कामांसाठी पैशाची गरज असते. राज्य शासनाकडून धानाचे बोनस सात महिने लोटले तरी अजूनही मिळालेले ...
कोट
खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध कामांसाठी पैशाची गरज असते. राज्य शासनाकडून धानाचे बोनस सात महिने लोटले तरी अजूनही मिळालेले नाहीत. त्यात डिझेल, बियाणे, खते, मजुरी महागल्याने शेतकऱ्यांत राज्य सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
विष्णुदास हटवार, भाजप तालुका ग्रामीण महामंत्री, भंडारा बॉक्स
शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहिना
भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र अलीकडे महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली असून एक एकर धान शेतीसाठी जवळपास २५ हजार रुपये खर्च येतो. मात्र दुसरीकडे वर्षाकाठी धानाचे उत्पादन हाती आल्यानंतर निव्वळ चार ते पाच हजार रुपये हाती राहत असल्याने हात बसेना काम दिसेना अशी अवस्था बळीराजाची झाली असून वर्षानुवर्षे शेतकरी संकटातून बाहेर निघत नसल्याने याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप हटवार यांनी केला आहे.