शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

By admin | Published: October 9, 2015 01:19 AM2015-10-09T01:19:43+5:302015-10-09T01:19:43+5:30

सततची नापिकी, त्यावर कोरड्या दुष्काळाचा मारा व सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार,

Farmer's suicide attempt! | शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

Next

रुपेरा शिवारातील घटना : कर्जबाजारीपणाला कंटाळून केली कृती
तुमसर : सततची नापिकी, त्यावर कोरड्या दुष्काळाचा मारा व सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार, या विवंचनेत असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ६ ला दुपारी १ वाजताच्या दरम्यान रुपेरा येथे घडली. देवदास मारोती कावळे (५५) रा.मिटेवानी ता.तुमसर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
देवदास कावळे यांच्याकडे साधारणत: अडीच ते तीन एकर शेतजमीन आहे. त्यात तो धानाचीच शेती करून त्यावर तो व त्याचे कुटुंब उदरनिर्वाह करीत होते. मात्र गत तीन वर्षांपासून सततची नापिकी होत होती. यावर्षी चांगले या आशेपोटी शेतकरी कामाला लागला. मात्र यावर्षीही पावसाने दगा दिला. देवदासने तुमसर येथील सावकारी दुकानदाराकडे घरातले २२ ग्रॅम सोने गहाण ठेवून पैशाची उचल केली. ही बाब त्याचकडे मिळालेल्या चिट्ठीवरून लक्षात आली.
परंतु सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असताना देवदास कावळे तुमसर येथे आला व तिथून तो हरदोली (सिहोरा) येथे उतरून पायवाटे रुपेराकडे जात असताना रुपेरा जंगलातील एका लिंबाच्या झाडाच्या आडोशाला बसून त्याने विष प्राशन केले. यावेळी शेतशिवारात पाणी देण्याकरिता आलेल्या एका महिलेने ही बाब बघितली. ही वार्ता घरच्यांना सांगितली. सिहोरा पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी देवदास जीवीत होता. लगेच त्याला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र देवदासचे कोणतेही नातेवाईक नसताना प्रमोद तितीरमारे, बाळा ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी दाखवून त्याला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तपास सिहोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय डोंगरे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Farmer's suicide attempt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.