शेतकऱ्यांनो महाबीज बीजोत्पादन अग्रिम योजनेचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:36+5:302021-05-19T04:36:36+5:30
उत्पन्नवाढीसाठी बीजप्रक्रियेकरिता लागणारे जैविक खते व जैविक बुरशीनाशक बीजोत्पादन शेतकऱ्यांना अतिशय रास्त दराने पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांकडून उत्पादनातील बियाणे ...
उत्पन्नवाढीसाठी बीजप्रक्रियेकरिता लागणारे जैविक खते व जैविक बुरशीनाशक बीजोत्पादन शेतकऱ्यांना अतिशय रास्त दराने पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांकडून उत्पादनातील बियाणे महाबीजला मिळाल्यानंतर ८० टक्के पेमेंट शेतकऱ्यांना त्वरित करण्यात येते. बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत उत्पादित बियाण्याची महाबीज धोरणानुसार साधारण बाजार मूल्यापेक्षा २० ते ३० टक्के ज्यादा दर देण्यात येतो. याव्यतिरिक्त बोनस देखील देण्यात येतो. शेतकऱ्यांचा व्यापारी, दलालातून सुटका होते. साठवणुकीचा खर्च वाचून बियाण्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. सीएसआर फंडातून बीजोत्पादक शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मदत करण्यात येते. शासनामार्फत जाहीर सबसिडीचा फायदादेखील शेतकरी बांधवांना देऊन बियाणे रास्त दरात उपलब्ध होते. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन २०२१ हंगामासाठी बीजोत्पादन आरक्षण योजनेत सहभागी व्हावे, तसेच अधिक माहितीसाठी महाबीजच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एन. पी. खांडेकर यांनी केले आहे.
बॉक्स
शंभर टक्के खात्रीची हमी
बाजारात विविध खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अनेकदा फसवणूक होते. मात्र, त्या तुलनेत महाबीज शासनाचा उपक्रम असल्याने शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही, यासोबतच शेतकऱ्यांना विविध उपक्रमांतर्गत फायदेशीर शेती राबवण्यासाठी देखील मार्गदर्शन केले जाते. यासोबतच शेतकऱ्यांना तज्ज्ञ अधिकारी व दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी महाबीजमार्फत तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत पीक कापणी, बियाण्यातील भेसळ ओळखणे, विलगीकरण, पीक संरक्षण, कापणी, मळणी, साठवणूक आदी गोष्टींवर सखोल मार्गदर्शन केले जाते. शिवाय बियाण्याची शंभर टक्के हमीही मिळते.