शेतकऱ्यांनो, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:10 PM2018-08-26T23:10:53+5:302018-08-26T23:11:50+5:30

बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती साधावी. कितीही संकटे आले तरी न डगमगता त्यावर मात करत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा लाभ घेवून स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी उपस्थित शेतकºयांना केले.

Farmers, take advantage of the schemes of the Agriculture Department | शेतकऱ्यांनो, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्या

शेतकऱ्यांनो, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देमधुकर कुकडे : भंडारा कृषी विभागातर्फे शेतकरी दिन, विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती साधावी. कितीही संकटे आले तरी न डगमगता त्यावर मात करत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा लाभ घेवून स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी उपस्थित शेतकºयांना केले.
पद्मश्री विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारला कृषी विभागाच्या वतीने शेतकरी दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा गोडमाटे उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, साकोली कृषी विन केंद्राचे तज्ज्ञ डॉ.शामकुवर, बलसाने, कृषी उपसंचालक भंडारा, कृषीभूषण पुरस्कारप्राप्त अण्णाजी हांडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रज्ञा गोडमाटे यांनी मार्गदर्शनात शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेवून जास्तीत जास्त फळबागा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.
अण्णाजी हांडे यांनी प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास संकटावर मात करता येते. असा विश्वास बोलताना व्यक्त केला. शेतकऱ्यांनीही आपला शेतीव्यवसाय प्रामाणिकपणे करून सेंद्रीय शेतीसाठी योगदान देण्याची गरज असल्याचे सांगितले.
कृषीशास्त्रज्ञ डॉ.शामकुवर यांनी शेतकऱ्यांना उत्पादनवाढीच्या विविध बाबी समजावून सांगून कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने शेतीत बदल करण्याचे आवाहन केले.
शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांचा खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते तसेच जिल्हा कृषी अधिक्षक चव्हाण यांच्या हस्ते, प्रज्ञा गोडगाटेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये शेषराव निखाडे (कृषीभूषण पुरस्कार प्राप्त) शेतकरी, यादोराव मेंढे शेतीनिष्ठ शेतकरी, डॉ.संजय एकापुरे प्रगतशील शेतकरी, तानाजी गायधने चिखलीचे प्रयोगशील शेतकरी, दुर्योधन सयाज, देवानंद गायधने या जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सदर कार्यक्रमात भातपिकांचे कीड, रोग सर्वेक्षण, शेतातील महिलांचा सहभाग, खोडकिडींच्या नियंत्रणासाठीची उपाययोजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन करून सेंद्रीय शेतीसाठी तंत्रज्ञान अवलंबिण्याबाबत आवाहन केले. शेतकऱ्यांनी आधुनिक पिक पध्दतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.
कृषीदिनासाठी जिल्हाभरातून अनेक शेतकरी तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, मंडळ अधिकारी होमराज धांडे, डी.एस. अहिर, पर्यवेक्षक बी.डी. बावनकर, ए.के. डोर्लीकर यांच्यासह कृषी कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले. संचालन आनंद मोहतुरे यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी कोडापे, मेहर, नान्हे, मेश्राम, गिरीश रणदिवे, अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Farmers, take advantage of the schemes of the Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.