शेतकरी धान मोजणीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:44+5:302021-07-27T04:36:44+5:30
उन्हाळी धान खरेदीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. गोदामाच्या समस्येपासून बारदानापर्यंत अनंत समस्या निर्माण झाल्या आहेत. ऐन पावसात धान खरेदी ...
उन्हाळी धान खरेदीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. गोदामाच्या समस्येपासून बारदानापर्यंत अनंत समस्या निर्माण झाल्या आहेत. ऐन पावसात धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. जिल्हा पणन कार्यालयाने धान खरेदीचे धोरण सकारात्मक न ठेवल्याने जुलै महिना धान खरेदीला उजाडला. शासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बारदानाची समस्या आजची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. शेवटी शेतकऱ्यांच्या बारदानातच खरेदीचे प्रयत्न सुरू झाले. असेच प्रयत्न पूर्वी झाले असते, तर शेतकऱ्यासह आधारभूत केंद्रांनाही हायसे वाटले असते, परंतु नियमाच्या बंधनामुळे नियमात शिथिलता देऊ शकले नाही. त्यामुळे तब्बल मे, जून व जुलै महिन्यात धान खरेदीत अडकली.
बॉक्स
शेतकऱ्यांचा संताप
धान खरेदी सहनशीलतेच्या पुढे गेल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाची भाषा सुरू झाली. शेतकरी रस्त्यावर येत असल्याचे पाहून अधिकारी जागे झाले. शेतकऱ्यांच्या समस्येची तीव्रता समजून घेतली. धान खरेदीचे आदेश दिले. आता फक्त मुदतवाढीच्या आदेशाची प्रतीक्षा कायम आहे.
बॉक्स
धान पिकविणे व विकणे कठीणच!
निसर्गाच्या लहरीपणा आणि महागाईचा मार खात धानाची शेती करावी लागते. धान पीक इतर पिकांच्या तुलनेत खर्चिक आहे, परंतु शासनाचे हक्काचे आधारभूत केंद्र असल्याने शेतकरी धानाकडे अधिक लक्ष देत आहे, परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी भरडला जात आहे. उन्हाळी हंगामात निश्चितच धानाच्या क्षेत्रात तूट निर्माण होईल. पर्यायी पिके लावली जातील.
- हेमंत सेलोकर, प्रगतशील शेतकरी खुनारी, पालांदूर.