शेतकरी होणार समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:11 AM2018-04-06T01:11:32+5:302018-04-06T01:11:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होणार आहेत.
यावर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. शेतकºयांना रब्बी पीक लावण्यास शासनाने मनाई केल्यामुळे आ. विजय रहांगडाले यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकºयांच्या शेतात पाणी जाण्यासाठी जुने कालवे दुरुस्ती तसेच कालव्यांची लांबी वाढविण्याची मागणी केली होती. त्यावर शासनाने मंजुरी देत ५ कोटी ८४ लाख रूपये मंजूर केलेले आहे.
यामध्ये चिरेखनी लघू कालवा बांधकामाकरिता ३५ लाख, कवलेवाडा वितरिकेच्या २ उजवा लघू कालव्यांच्या बांधकामाकरिता २५ लाख, मुख्य कालवा व त्यावरील लघू कालव्याची तसेच तिरोडा वितरिका व त्यावरील लघूकालव्याच्या दुरुस्तीकरिता ४५ लाख, कवलेवाडा वितरिकेच्या ४ (डावा) लघू कालव्यांच्या बांधकामाकरिता १.१७ कोटी, मरारटोला-कवलेवाडा रस्त्यावरील व कवलेवाडा वितरिकेवरील लहान पुलाचे बांधकाम १० लाख, कवलेवाडा वितरिका व त्यातील लघू कालव्याची दुरुस्तीची कामे १५ लाख, खैरबंदा उर्ध्वनलिकेवर माती भरावयाच्या कामाकरिता २५ लाख, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ च्या कळप्रांगणाच्या बांधकामासाठी १.८० कोटी, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ च्या बॅरेज मीटर रुमच्या बांधकामाकरिता ७० लाख, सालेबर्डी पुच्छ कालव्याच्या बांधकामाकरिता ३५ लाख, सालेबर्डी २ (उजवा) तिरोडा वितरिका व ११ (डावा) मुख्य कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाकरिता १५ लाख, मुख्य कालव्यावरील मुंडीपार गावाजवळ दोन पुलांच्या दुरुस्तीच्या कामाकरिता ५ लाख, मुख्य कालव्याच्या ४ उजव्या कालव्यांवरील उपलघू कालव्यांचे उर्वरित बांधकामाकरिता ७ लाख रूपये आदी बांधकामांचा समावेश आहे.
या सर्व बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते माजी आ. वैद्य यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या वेळी कृउबास सभापती डॉ. ंिचंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, सहायक अभियंता निखिल अहिरवार, उपअभियंता पंकज गेडाम, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, पं.स. सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, पवन पटले, कृउबास संचालक घनशाम पटले, पिंटू रहांगडाले, सरपंच किरण पारधी, गुलाब कटरे, वासुदेव हरिणखेडे, वनिता नागपुरे, प्रकाश भोंगाडे, विनोद लिल्हारे, सुनील अटराहे, योगशिला पारधी, अनिल मरस्कोल्हे, मंगला खेवले, स्वप्नील बन्सोड, जयसिंग उपासे व मोठ्या संख्येने गावकरी व संबंधित यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.