शेतकरीच करणार पारंपरिक धान बियाणांची लागवड

By Admin | Published: June 17, 2016 12:45 AM2016-06-17T00:45:21+5:302016-06-17T00:45:21+5:30

२०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता...

Farmers will cultivate traditional paddy seeds | शेतकरीच करणार पारंपरिक धान बियाणांची लागवड

शेतकरीच करणार पारंपरिक धान बियाणांची लागवड

googlenewsNext

सुधीर धकाते : खरीप हंगामाकरिता ४५ शेतकरी प्रशिक्षित
भंडारा : २०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने यावर्षी चार एकरच्या धानांचा शेतकऱ्यांना पुरवठा करून १५००० क्विंटल बियाणे भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यामधील ६ तालुक्यात शेतकरीच बियाणे शुद्धीकरण व लागवड करून बियाणाची निर्मिती करणार आहेत.
पूर्व विदर्भ धान शेतीच्या वैशिष्ट्याचा वारसा व भांडार समजला जात होता. नावाजलेल्या पारंपारिक धानाच्या अनेक जाती यात लुचई, लुडका, दुबराज, हीरानक्की, चिन्नोर, काडीकमो, बासबिर्रा नावारुपाला आणणारा विभाग. काळाच्या ओघात या जाती दुर्मिळ होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परीणामी शेतकरी बियाणामध्ये परावलंबी झाला याचा प्रचिती कृषी जैवविविधतेवर पडली. या बदलाला रोकण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर ‘राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाच्या’ सहकार्याने ‘महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रम’ ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे ‘कृषी जैवविविधत संवर्धनाचे’’ कार्य सुरु झाले. प्रकल्पा अंतर्गत ५ वर्षात भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात कृषी जैवविविधतेचा शोध घेवून शेतकऱ्याद्वारे बियाणाचे शुद्धीकरण करणे, वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण, पोषक घटकाचा अभ्यास, लोकसहभागातून पारंपारिक बियाणे बँकेची निर्मिती, बियाणाचा विस्तार दुर्मिळ वाणाचे जैवविविधता नोंदवून राष्ट्रीय जनुक कोष मध्ये नोंदणी करणे हे उद्दिष्टये आहे. यावर्षीच्या हंगामासाठी साकोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड व ब्रम्हपुरी तालुक्यातील ४५ गावातील शेतकरी गटप्रमुखाची निवड करण्यात आली. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या प्रशिक्षण सभागृहात बीज संवर्धन शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाचे मुख्य प्रशिक्षक व महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाचे समन्यवक सुधीर धकाते व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणामध्ये बियाणे शुद्धीकरणाचे टप्पे, बियाणे लागवड पद्धती शेतकऱ्यांनी समजून घेतली. प्रत्येक गावात ६ शेतकऱ्यांची निवड होईल. ७५ एकरामध्ये २५० शेतकऱ्यांची निवड करून शास्त्रीय पद्धतीने बियाणाची लागवड करून घेण्याची जबाबदारी गटप्रमुखानी स्वीकारली. पुढील हंगामाकरिता बियाणे निर्मिती करून २५ बिज बॅक प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याचे ठरविण्यात आले.
सदर कार्यक्रम देखरेख प्रक्रिया व व्यवस्थापन प्रक्रिया संक्षम करण्याची जबाबदारी देवेंद्र राऊत (मोरगाव अर्जुनी), ज्ञानेश्वर बनकर (साकोली), भदुजी कायते (भंडारा), छत्रपती बघमारे (ब्रम्हपुरी) यांच्याकडे सोपविण्यात आली असून प्रशिक्षण यशस्वी होण्यास यांचे योगदान मिळाले. सदर उपक्रमामुळे स्थानिक जातीे पिकांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होईल. तसेच पोषमुल्य असलेले अन्न ग्राहकांना उपलब्ध होतील व दुर्मीळ बियाणावर शेतकऱ्यांचे हक्क प्रस्तापित होण्यासाठी मदत होईल. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Farmers will cultivate traditional paddy seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.