प्रशासनाच्या विरोधात करणार उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2016 01:24 AM2016-02-07T01:24:46+5:302016-02-07T01:24:46+5:30

सततच्या दुष्काळामुळे फक्त शेतीच्या व्यवसायावर उदरनिर्वाह होत नसल्याने पुरक व्यवसायाकडे वळले व ट्रॅक्टर खरेदी केला.

Fasting against the administration | प्रशासनाच्या विरोधात करणार उपोषण

प्रशासनाच्या विरोधात करणार उपोषण

Next

पोलिसात निवेदन : ट्रॅक्टर चालक, मालक, हमाल, बेलदार व मजूरांचा इशारा
तुमसर : सततच्या दुष्काळामुळे फक्त शेतीच्या व्यवसायावर उदरनिर्वाह होत नसल्याने पुरक व्यवसायाकडे वळले व ट्रॅक्टर खरेदी केला. परंतु गत दोन महिन्यापासून पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच वनविभागातर्फे व्यवसाय करण्यास मज्जाव होत आहे. त्यामुळे परिवारावर उपासमारीची पाळी आल्याने ट्रॅक्टर चालक, मालक, हमाल, बेलदार व मजूर वर्ग ८ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसणार असल्याचे निवेदन पोलिसांना सोपविले.
अस्मानी संकटामुळे तर कधी सुलतानी संकटामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या परिवाराचे उदरनिर्वाह होणे शक्य नाही. दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई व धानाला मिळणारा अतिअल्प भाव व तालुक्यात उद्योगधंदे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे धाव घेतली. विटा भट्टी, रेती, मुरुम, भरण, माती, बदरी कारटिंगचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र त्यातही पोलीस प्रशासन, महसूल व वन विभागाने त्रास देणे सुरु केले आहे. गुन्हे दाखल करण्यासोबत अवाजवी वसुली सुरु झाल्याने सर्व कामे बंद पडली आहेत. परिणामी व्यवसायातून उत्पन्न होणे बंद झाले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असल्याने तुमसरात संघटना तयार झाली व अल्प दरात रेती उपलब्ध करून देणे, मुरुम, माती, बदरी आदी गौण खनिज मलमा भरणा ने आण करण्याकरिता सुट देणे, ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया बंद करणे, महसूल विभागातर्फे १०० रु. स्टँप पेपरवर हमीपत्र लिहून घेणे बंद करणे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस विभागामार्फत मुख्यमंत्री राजस्वमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना पाठवून दि. ८ फेब्रुवारीला माताटोली येथील कृष्णमंदिरापासून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमुद केले.
यावेळी संघटनेचे सचिन लांजेवार, बाल्या राऊत, बादल खोब्रागडे, सलाम तुरक, बाल्या भुरे, बाळा लांजेवार, बंटी भुरे, आरिफ पटेल, सुनिल चकाले, संतोष महाकाळकर, हरिष ढोके, दिनेश ढोके आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Fasting against the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.