ब्लड आॅन कॉलच्या सुविधेसाठी उपोषण
By admin | Published: September 8, 2015 12:36 AM2015-09-08T00:36:10+5:302015-09-08T00:36:10+5:30
ब्लड आॅन कॉलची सुविधा साकोली व सेंदूरवाफा येथे पुरविण्यात यावी, यासाठी साकोली येथे तहसील कार्यालयासमोर ..
साकोली : ब्लड आॅन कॉलची सुविधा साकोली व सेंदूरवाफा येथे पुरविण्यात यावी, यासाठी साकोली येथे तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या आश्वासन हे आंदोलन बंद करण्यात आले. या मंडपाला आ.बाळा काशीवार यांनी भेट देऊन शासनामार्फत योग्य ती कारवाईची हमी दिली आहे.
साकोली व सेंदूरवाफा या गावचे अंतर ४१ कि.मी. असून फक्त १ कि.मी. साठी येथील नागरिक या सुविधेपासून वंचित राहतात. त्यामुळे शासनाने ही अट शिथील करून या योजनेचा लाभ साकोलीवासीयांना देण्यात यावा, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र निवेदन देऊनही शासनाच्या वतीने काहीच दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आता तहसील कार्यालयापुढे सर्वपक्षीय एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंडपाला भेट देऊन योजनेचा लाभ साकोली व सेंदूरवाफावासीयांना मिळावा यासाठी वरिष्ठांना माहिती देऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आ.बाळा काशीवार यांनी ४० कि.मी. अट रद्द करून ५० कि.मी. पर्यंत या योजनेचा लाभ मिळावा ,म्हणून शासनातर्फे सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
या उपोषणात अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, माजी आ.डॉ.हेमकृष्ण कापगते, हेमकृष्ण वाडीभस्मे, नरेंद्र वाडीभस्मे, रवी राऊत, डॉ.राजेश चंदवानी, हेमंत भारद्वाज, प्रविण भांडारकर, शारदा वाडीभस्मे, प्रदीप मासूरकर, मनिष कापगते, अचल मेश्राम, लता दुरुगकर, सविता शहारे, आशा हटवार, डॉ.अनिल शेंडे, अखिलेश गुप्ता, राकेश भास्कर, परशुराम लांजेवार, अंगराज समरीत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)