सीतेपारच्या अन्यायग्रस्त लाभार्थ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:05 PM2018-08-27T23:05:10+5:302018-08-27T23:05:31+5:30

सीतेपार येथील सुमारे १०० कुटुंबाची नावे सोंड्या ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट झाल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित झाले. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंच गजानन लांजेवार यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त लाभार्थ्यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.

Fasting for the unfriendly beneficiaries of Seetapar | सीतेपारच्या अन्यायग्रस्त लाभार्थ्यांचे उपोषण

सीतेपारच्या अन्यायग्रस्त लाभार्थ्यांचे उपोषण

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकरण घरकुलाचे : खंडविकास अधिकाऱ्यांनी दिली भेट, पावसामुळे उपोषणकर्त्यांच्या समस्यांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सीतेपार येथील सुमारे १०० कुटुंबाची नावे सोंड्या ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट झाल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित झाले. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंच गजानन लांजेवार यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त लाभार्थ्यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
सितेपार येथील ग्रामसभेने सन २०१६ मध्ये ठराव घेऊन पंचायत समितीला लेखी माहिती सादर केली होती. परंतु अद्यापपर्यंत कारवाई केली नाही. चुकीच्या सर्वेक्षणामुळे सितेपार येथील लाभार्थी घरकुलापासून वंचित झाले. सोंड्या ग्रामपंचायतमध्ये येथील १०० लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झाली आहेत. प्रपत्र ड यादीत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता सरपंच गजानन लांजेवार यांच्या नेतृत्वात सोमवारपासून लाभार्थ्यांनी आमरण उपोषण सुरु केले. सध्या पाऊस सुरु असल्याने उपोषणकर्त्यांना नैसर्गिकस्थितीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान खंडविकास अधिकारी पी.डी. निर्वाण यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सरपंच गजानन लांजेवार, अन्यायग्रस्त लाभार्थ्यांशी चर्चा केली. तांत्रिक कारणामुळे सोंड्या येथे लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झाली असून जिल्हास्तरावर याची माहिती दिली. परंतु तोडगा निघाला नाही. ठोस आश्वासन व कारवाईशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा अन्यायग्रस्तांनी घेतला आहे.

तांत्रिक कारणामुळे येथे लाभार्थ्यांची नावे सोंड्या गावात समाविष्ट झाली आहेत. विशेष बाब म्हणून त्यास मंजूरी प्राप्त करावी लागेल. याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
-पी.डी.निर्वाण, खंडविकास अधिकारी, पं.स. तुमसर
शंभर लाभार्थ्यांवर अन्याय झाला असून घरकुलांपासून ते वंचित आहेत. चुक झाली तर चुक तात्काळ दुरुस्त करावी. एनआयसीने येथे दखल घ्यावी. ठोस कारवाईनंतरच आमरण उपोषण मागे घेण्यात येईल.
-गजानन लांजेवार, सरपंच, सितेपार.

Web Title: Fasting for the unfriendly beneficiaries of Seetapar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.