ट्रकबाहेर लोंबकळणाऱ्या सळाखी ठरताहेत जीवघेण्या

By admin | Published: December 29, 2014 12:56 AM2014-12-29T00:56:19+5:302014-12-29T00:56:19+5:30

राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक साहित्याची नियमबाह्यरीत्या वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाली आहे.

The fatal hanging out of the truck | ट्रकबाहेर लोंबकळणाऱ्या सळाखी ठरताहेत जीवघेण्या

ट्रकबाहेर लोंबकळणाऱ्या सळाखी ठरताहेत जीवघेण्या

Next

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक साहित्याची नियमबाह्यरीत्या वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. ट्रक किंवा अन्य वाहतुक करणाऱ्या वाहनांबाहेर सळाखी, लोखंडी कांबी, अँगल, आणि पत्रे घेऊन जाताना दिसत आहेत. याकडे पोलीस, महामार्ग पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या मुंबई- कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेले आहे. या महामार्गावर भंडारा, लाखनी व साकोली ही तीन शहरे वसली आहेत. जिल्ह्यात या महामार्गाची लांबी जवळपास ७२ किलोमीटर इतकी आहे. या महामार्गाहून दिवसाकाठी हजारो वाहनांची वाहतूक होत असते. यात बहुतांश वाहतुक नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे दिसुन येते. क्षमतेपेक्षा जास्त साहित्यांचे वहन, वाहनाबाहेर लोंबकळणारे साहित्य, किंवा वाहनात क्षमतेपेक्षा जास्त उंचीपर्यंत भरलेल्या साहित्याची वाहतुक होत असते. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
काय म्हणतो नियम?
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात सआदेश दिले आहेत. नियमा%माणे ट्रकबाहेर कुठलीही वस्तु लोंबकळत ठेवू नये. मात्र वाहनाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार किंवा त्यांनी मागितल्यास विशेष परवानगी देण्यात येते. ही कारवाई ‘वाहन परवान्यापेक्षा जास्त वस्तुंची वाहतुक’ या सदरात मोडते. धोका दर्शविण्यासाठी वाहनाच्या मागील बाजुला लाल कापड किंवा लाल दिवा सुरू ठेवणे आवश्यक आहे. याकडे वाहन चालक दुर्लक्ष करतात. दंडात्मक कारवाईची गरज आहे.
महामार्गावर नेहमी वर्दळ
भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत बहुतांश शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँका तर कुठेकुठे आठवडी बाजार भरत असतो. त्यामुळे अत्यंत रहदारी असणाऱ्या या मार्गावर अशा नियमबाह्य ‘लोडेड’ वाहतुकीचा फटका बसू शकतो. (प्रतिनिधी)

Web Title: The fatal hanging out of the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.