विध्यार्थ्यांचा तुटलेल्या डोंग्यातून जीवघेणा प्रवास
By admin | Published: July 15, 2016 12:47 AM2016-07-15T00:47:03+5:302016-07-15T00:47:03+5:30
पावसाळा सुरु झाला की तालुक्यातील नदी काठावर असलेल्या गावकरी व विध्यार्थ्यांचे हाल होतात. शाळेला सुटी नको, शिक्षणात अडथळा ...
व्यथा आवळीवासीयांची : प्रशासन लक्ष देणार का..?
प्रमोद प्रधान लाखांदूर
पावसाळा सुरु झाला की तालुक्यातील नदी काठावर असलेल्या गावकरी व विध्यार्थ्यांचे हाल होतात. शाळेला सुटी नको, शिक्षणात अडथळा थांबवण्याकरीता तसेच शेतीची कामे अगदी वेळेवर पूर्ण व्हावीत म्हणून मागील पंचेवीस वषार्पासून तालुक्यातील आवळी वासी तुटक्या व जीर्ण झालेल्या डोंग्यातून दररोज जीवघेणा प्रवास करीत आहेत.
तालुक्यातील आवळी हे गाव चुलबंद व वैनगंगा नदिच्या काठावर वसलेले आहे. दोन नद्यांचे संगम लाभलेले हे गाव सोनी संगम म्हणून प्रसिध्द असले तरी दरवर्षी येणाऱ्या पुराचा तडाखा सहन करण्याची हिंमत अद्याप गावकऱ््यानी सोडली नाही. हे गाव बेटासारखे असले तरी अनेक विध्यार्थी दरवर्षी लाखांदूर, वडसा, ब्रम्हपुरी, येथे महाविध्यालयीन शिक्षणाकरीता नोकरीकरीता भर पावसाळ्यात डोंग्याने ये - जा करतात. १५० लोकसंख्या असलेले हे बेट स्वरुपी गावाचे यापुर्वी ईंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले. शेती व घर बांधकामाकरीता शासनाकडुन जागा उपलब्ध करुन देण्यात आली. परंतु संपुर्ण आवळी वाशियांचे पुनर्वसन करण्यात आले नसल्याने तसेच पुनर्वसन योग्य पद्धतीने न झाल्याने पुनर्वसन झाल्यानंतरही आवळीवासियांनी गाव सोडले नाही. पावसाळ्यात गावाबाहेर निघण्यासाठी दुसरा मार्ग नाही. मात्र शाळा, शेती व इतर कार्यालयीन कामासाठी गावाबाहेर जाण्याआधी एकच मार्ग तो म्हणजे तुटक्या डोंग्याने प्रवास.
शिक्षणाकरीता आवळी येथील विध्यार्थी सोनी, लाखांदुर, वडसा, ब्रम्हपुरी येथे दररोज जातात. पुर परिस्थीती व नदिला पाणी असल्याने स्वत: गावकरी व विध्यार्थी डोंगा हाकुन नदि पार करतात. ये - जा करण्याची ठरलेली वेळ नसल्याने गावकरिच डोंगा चालवितात. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवळी येथील शेतकरी शुध्दा बिंधास्त स्वत: डोंगा चालवुन शेतीची कामे पार पाडतात. डोंगा पाण्यात उलटुन मरण पावल्याच्या घटना ताज्या असतानाच तालुक्यात असला अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन तालुका प्रशासन लक्ष देवुन असला तरी शक्यता नाकारता येत नाही.
शिक्षिका पुरातून शाळेत जाते तेव्हा...
आवळी येथील विध्यार्थी व गावक?्यांचा पुरातुन डोंग्याने प्रवास हा नित्याचाच असल्याने त्याना भिती वाटत नाही मात्र एका महिला शिक्षकाची नियुक्ती आवळी येथील जि. प. प्राथमीक शाळेत आहे. आवळी येथे वर्ग १ ते ४ पर्यंत आहेत २ शिक्षकी शाळेत २२ विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील ३ वषार्पासुन ती शिक्षीका पुरात व सोनी ते आवळी ५ कि. मी. चा प्रवास तुटक्या डोंग्यातुन करुन शिक्षणाचे कार्य प्रामाणीक पार पाडत आहे. अनेकदा विनंती अर्ज करुनही बदली होत नसल्याने शिक्षण विभागाचे अधिकारी हितसबंध जोपासणाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदली करुन देण्याचे धाडस दाखवतात. मात्र त्या महिला शिक्षकाच्या विनंती अजार्चा साधा विचार झालेला नाही.