शेतातील विद्युत रोहित्र ठरताहेत जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 09:44 PM2018-10-07T21:44:17+5:302018-10-07T21:44:36+5:30
वीज मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्युत रोहित्रांची अवस्था सुधारलेली नाही. घोषणा करुन एक वर्षांचा कालावधी लोटला असला तरी शेतशिवारातील असो कि रस्त्याच्या कडेवरील विद्युत रोहित्र, हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरु पाहत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील मिटेवानी शेतशिवारात दिसून येत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
तुमसर : वीज मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्युत रोहित्रांची अवस्था सुधारलेली नाही. घोषणा करुन एक वर्षांचा कालावधी लोटला असला तरी शेतशिवारातील असो कि रस्त्याच्या कडेवरील विद्युत रोहित्र, हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरु पाहत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील मिटेवानी शेतशिवारात दिसून येत आहे.
महावितरणच्या विद्युत रोहित्रातील डीपी बऱ्याच दिवसांपासून उघडे आहे. एखाद्या लहान बालकाचा हात सहजरित्या या डीपीपर्यंत पोहोचू शकतो. समस्या सांगूनही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी व नागरिकांचे म्हणने आहे. या संदर्भात वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेत सदर विद्युत रोहित्र बदलविणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात या समस्येचे दखल न घेतल्यास शिवसेनेचे कार्यालय प्रमुख अमित मेश्राम यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.