397 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद; आज मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2022 09:53 PM2022-10-16T21:53:39+5:302022-10-16T21:54:34+5:30

भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्यांतर्गत १९ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी थेट सरपंचपदासह १२२ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात एकट्या भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ७२, तर १२२ सदस्यपदासाठी ३२५ उमेदवार रिंगणात होते. १० सदस्य अविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यातील ६५ मतदार केंद्रांवर २८ हजार ५४० मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते.

Fate of 397 candidates EVM off; Counting today | 397 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद; आज मतमोजणी

397 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद; आज मतमोजणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील चार तालुक्यांतर्गत १९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान रविवारी पार पडले. यात दोन केंद्रात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान झाले. एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, सरपंचपदासह सदस्यांसाठीचे एकूण ३९७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे. दरम्यान, सोमवारी १७ ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्यांतर्गत १९ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी थेट सरपंचपदासह १२२ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात एकट्या भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ७२, तर १२२ सदस्यपदासाठी ३२५ उमेदवार रिंगणात होते. १० सदस्य अविरोध निवडून आले आहेत.
जिल्ह्यातील ६५ मतदार केंद्रांवर २८ हजार ५४० मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यात १४ हजार ३६० पुरुष, तर १४ हजार १८० महिला मतदारांचा समावेश आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. यात सकाळी ९.३० वाजेपर्यंत एकूण ९.६९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर हळूहळू मतदानाला वेग आला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २४.४९ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदानाची गती वाढली. १.३० वाजेपर्यंत १९ ग्रामपंचायतींसाठी ४३.७५ टक्के मतदान झाले होते. 
भंडारा तालुक्यातील परसोडी येथे मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे रात्री ८ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सायंकाळच्या सुमारास या मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी दिसून आली. दिव्यांग मतदारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सोमवारी कुणाला सरपंच पदाची लॉटरी व सदस्यपद लाभते याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

१७ हजार नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
- जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रविवारी १७ हजारपेक्षा जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नोंदणी अंतर्गत ११ हजार ७२४ पुरूष तर ११ हजार ६०१ महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी आठ हजार ८११ पुरूष व आठ हजार ५५६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरूष मतदानाची टक्केवारी ७५.१५ तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ७३.७५ टक्के इतकी आहे. 

 

Web Title: Fate of 397 candidates EVM off; Counting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.