जीवघेणे ठरते आहे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Published: February 7, 2015 11:17 PM2015-02-07T23:17:30+5:302015-02-07T23:17:30+5:30

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगचे फाटक आहे. एकवेळा फाटक बंद झाल्यावर २० मिनिटानंतर उघडते. दिवसभर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेमुळे

The fate of which is to cross the railway crossing | जीवघेणे ठरते आहे रेल्वे क्रॉसिंग

जीवघेणे ठरते आहे रेल्वे क्रॉसिंग

Next

उड्डाणपुलाचे काम थंडबस्त्यात : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची फरफट सुरूच
तथागत मेश्राम - वरठी
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगचे फाटक आहे. एकवेळा फाटक बंद झाल्यावर २० मिनिटानंतर उघडते. दिवसभर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेमुळे २४ तासात २० वेळा रेल्वे फाटक बंद राहते. उड्डाणपूल नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासनाची हेकेखोरी व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षतेमुळे उड्डाणपुलाचे काम थंडवस्त्यात आहे. सदर रेल्वे फाटक ग्रामस्थ व विद्यार्थ्यासाठी जीवघेणा ठरत आहे.
रेल्वे स्थानकामुळे गावाचे दोन भागात विभाजन झाले आहे. दररोज शेकडो विद्यार्थी व गावकरी एका बाजुने दुसरीकडे ये-जा करतात. गावाच्या सिमेपासून ते शेवटच्या टोकापर्यंत रेल्वे स्थानक विस्तारलेले आहे. भंडारा-तुमसर राज्यमार्ग रेल्वे फाटकाला ओलांडून जातो. वरठी व परिसरातील इतर गावातील लोक या रस्त्यांचा वापर करतात. दिवसेंदिवस या मार्गावरून ये-जा करणाऱ्याची संख्या वाढत आहे. त्यानुसार रेल्वे गाड्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २४ तास रेल्वे गाड्या धावले. यामुळे जास्तीत जास्त काळ ही फाटक बंद राहते.
एकदा फाटक बंद झाली की किमान १५ ते २० मिनिटे उघडत नाही. कधी कधी एकाचवेळी अपडाऊन या दोन्ही मार्गावरून रेल्वे गाड्या पाठोपाठ धावतात. त्यामुळे पुन्हा फाटक बंद राहण्याचा वेळ वाढतो.
मालवाहतुक गाड्यांना पुढील प्रवासासाठी सिग्नल न मिळाल्यास तासनतास रेल्वे रूळावर उभ्या राहतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. एकदा फाटक बंद झाल्यावर फाटकाच्या दोन्ही बाजुला वाहनाच्या रांगा लागतात. फाटक उघडताच धावपळ सुरू होते. फाटक बंद होण्यापुर्वी निघण्याच्या नादात एकमेकावर आदळतात. या रेल्वे फाटकावर ये-जा करण्याकरीता उड्डाणपुलाची गरज आहे.
धावपळीत रेल्वे रूळ ओलांडताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. रेल्वे प्लॉटफार्मची उंची चढून जाण्याकरीता मुलींना त्रास होतो. रेल्वे फाटक बंद झाल्यावर उघडण्यासाठी लागणाऱ्या वेळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
यामुळे येथील नागरिक जीव मुठीत घेवून रेल्वेरूळ ओलांडतात. रूळाच्या मध्यभागी रेल्वे उभी राहिल्यास विद्यार्थ्यांना मार्ग नसल्यामुळे रेल्वेच्या चाकातून मार्ग शोधून ये-जा करावे लागते. या भानगडीत गाडी मधेच सुटली की त्यांचा जीव जाण्याची भिती राहते. परंतु पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वरठीवासीयांना यातना भोगाव्या लागत आहेत.

Web Title: The fate of which is to cross the railway crossing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.