बाप रे! कोरोनाने एकाच दिवशी ३० जणांचा मृत्यू; ८६६ पाॅझिटिव्ह : आतापर्यंतचा मृतांची सर्वाधिक संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:35 AM2021-04-21T04:35:07+5:302021-04-21T04:35:07+5:30
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून, अलीकडे मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. ...
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून, अलीकडे मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. मंगळवारी ३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा तालुक्यातील १२, लाखनी ६, साकोली ५, मोहाडी, तुमसर आणि लाखांदूर तालुक्यांत प्रत्येकी २ आणि पवनी तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. ५० वर्षांआतील ९ जणांचा समावेश असून, २० पुरुषांचा मंगळवारी कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत भंडारा तालुक्यात ६१० व्यक्तींचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यात २९४, मोहाडी ५२, तुमसर ८१, पवनी ६६, लाखनी ४३, साकोली ४७, लाखांदूर २७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत्यूदर १.५५ टक्का आहे.
मंगळवारी ८८६ व्यक्तींचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात भंडारा ४४९, मोहाडी ८५, तुमसर १३३, पवनी ५७, लाखनी ७१, साकोली ३९, लाखांदूर ३२ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार २९८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यात १६ हजार ७११, मोहाडी ३,२८६, तुमसर ४,९१०, पवनी ४,५०४, लाखनी ४,२२०, साकोली ३,६५७ आणि लाखांदूर तालुक्यातील २,०१० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ३७० व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.
बाॅक्स
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येसोबतच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत होती. मात्र, दोन दिवसांपासून पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटत आहे. जिल्ह्यात सध्या १२ हजार ३१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात ५,३३९, मोहाडी ९०५, तुमसर १,३१५, पवनी १,३७१, लाखनी १,३६३, साकोली १,१७४, लाखांदूर ८५१ रुग्णांचा समावेश आहे.