मुलानेच वडिलांचा खून केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:20 PM2019-01-08T22:20:15+5:302019-01-08T22:21:11+5:30

वैनगंगा नदीच्या पात्रात पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलानेच वडिलांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मुलासह घरगड्याला पोलिसांनी अटक केली आहे.

The father has murdered his father | मुलानेच वडिलांचा खून केल्याचे उघड

मुलानेच वडिलांचा खून केल्याचे उघड

Next
ठळक मुद्देढिवरवाडाचे प्रकरण : अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : वैनगंगा नदीच्या पात्रात पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलानेच वडिलांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मुलासह घरगड्याला पोलिसांनी अटक केली आहे.
अर्जून दिलीपसिंग चव्हाण (२०) रा.ढिवरवाडा आणि महादेव उर्फ वामन हिरामण वाढीवे (३५) रा.डोंगरदेव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर दिलीपसिंग हरीसिंग चव्हाण (४८) रा.जुना ढिवरवाडा ता.मोहाडी असे मृताचे नाव आहे. ६ जानेवारी रोजी मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रात एका इसमाचे प्रेत पुरलेल्या अवस्थेत आढळून आले होते. प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यात अडचण येत होती. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच मृताची ओळख पटवून २४ तासात आरोपींना अटक केली. दिलीप हरीसिंग चव्हाण हा ८ डिसेंबर पासून बेपत्ता होता. या संदर्भात त्याचा मुलगा अर्जूनने करडी पोलीस ठाण्यात १२ डिसेंबर रोजी तक्रार दिली. परंतु त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान वैनगंगा पात्रात आढळलेला मृतदेह दिलीपसिंगचाच असल्याचे उघड झाले. परंतु खून कुणी केला हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांना होते. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात घरच्यांवरच तपास केंद्रीत केला. मुलगा अर्जून याला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. त्यावरून त्याने आपणच वडीलांचा खून केल्याचे कबुल केले.
७ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी अर्जून आपल्या घरी गेला तेव्हा त्याचे वडील दिलीपसिंग अर्जूनच्या सावत्र आईसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून भांडण करीत होता. मुलाला हा प्रकार दिसताच त्याने वडीलांना हटकले. त्यामुळे मुलासोबत वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अर्जूनने घरातील लोखंडी घन आणून दिलीपसिंगच्या डोक्यात घातला. त्यात तो जागीच गतप्राण झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, तुमसरचे ठाणेदार मनोज सिडाम, करडीचे ठाणेदार तुकाराम कोयंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पोटे, गणेश काळे, सचिन गदादे, उबाळे, जटाल यांनी ही कारवाई केली.
बैलगाडीतून लावली विल्हेवाट
घनाचा वार करून दिलीपसिंग ठार झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा अर्जूनने कट रचला. त्यासाठी त्याने घरगडी महादेव हिरामण वाढीवे याचे सहकार्य घेतले. वडील दिलीपसिंगचा मृतदेह बैलगाडीत टाकून वैनगंगा नदीपात्रात नेला. त्याठिकाणी खड्डा खोदून त्यात मृतदेह नदीपात्रात पुरण्यात आला. तसेच पुरताना मिठही टाकण्यात आले. मात्र दोन दिवसापूर्वी रेती उत्खनन करणाऱ्यांना नदीपात्रात एक पाय आणि हात वर आलेला दिसला. या घटनेची माहिती करडी पोलिसांना देण्यात आली आणि तेथून या खुनाला वाचा फुटली.

Web Title: The father has murdered his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.