धान्य न मोजण्याचा अधिकाºयांचा फतवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:02 PM2017-10-29T22:02:22+5:302017-10-29T22:02:39+5:30
मागील अनेक वर्षापासून येथे दोन शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. विजयलक्ष्मी राईस मिल असोसिएशन व खरेदी विक्री संघाचा पारडी नावाने दिघोरीतच आधारभूत धान खरेदी केंद्र आहे.
मुकेश देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : मागील अनेक वर्षापासून येथे दोन शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. विजयलक्ष्मी राईस मिल असोसिएशन व खरेदी विक्री संघाचा पारडी नावाने दिघोरीतच आधारभूत धान खरेदी केंद्र आहे. यावर्षी खरेदी-विक्री संघाने पारडी दिघोरी या नावाने असलेल्या गोदामात धान खरेदीचा शुभारंभ केला. मात्र या गोदामात फक्त पारडी येथीलच शेतकºयांच्या सातबारा असलेला धान खरेदी करावा, असा आदेश जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी दिला. यामुळे दिघोरीच्या शेतकºयांनी गोदामासमोर ठेवलेले धान्य उचलण्याची वेळ आली आहे.
दुसरीकडे विजयलक्ष्मी राईस मिल असोसिएशनचा दिघोरी नावाने गोदाम अजुनही सुरू न झाल्याने मळणी झालेले धान कुठे विकावे असा प्रश्न दिघोरीच्या शेतकºयांना पडला आहे. मागीलवर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामाच्या वेळी लक्ष्मी राईसमिल असोसिएशनला दिघोरीत गोदाम न मिळाल्यामुळे त्यांनी बारव्हा येथे दिघोरी नावाने धान खरेदी केंद्र सुरू केला.
परंतु बारव्हा हे अंतर १० कि़मी. असल्याने दिघोरीच्या कोणत्याच शेतकºयांने बारव्हा येथील धान खरेदी केंद्रावर धान दिले नाही. यावर्षीसुद्धा विजयलक्ष्मी राईस मिल असोसिएशनला दिघोरीत गोदाम मिळण्याची आशा धूसर दिसत आहे. तसेच पारडी दिघोरी नावाने सुरू असलेल्या गोदामात दिघोरीचे धान खरेदी न करण्याचा फतवा जिल्हा मार्केटिंग अधिकाºयाने काढला असल्याने दिघोरीच्या शेतकºयांमध्ये असंतोष पसरत आहे.
दिघोरी येथील शेतकºयांनी बाहेरगावच्या गोदामात जावून धान विकावे व गावातील गोदामात विकू नये हा कुठला न्याय आहे. दिघोरीला कायमस्वरूपी गोदाम देण्याची मागणी दिघोरी व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
एका गावाच्या नावाने दोन खरेदी केंद्र देता येत नाही. दिघोरीतील धान खरेदी फक्त एकाच गोदामात केली जाईल. दिघोरी नावाने विजयलक्ष्मी राईसमिल केंद्र चालवित होते. त्यांना याबाबत रितसर नोटीस देण्यात येईल. गोदाम सुरू करण्यासाठी त्यांना किमान आठ दिवसांची मुदत देण्यात येईल तोपर्यंत म्हणजेच जवळपास दिघोरी येथे तोडगा निघल्याशिवाय १० ते १२ दिवसांपर्यंत धान मोजता येणार नाही.
-गणेश बर्वे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.
दरवर्षी दिघोरी पारडी या नावाने सुरू असलेल्या गोदामात दिघोरीच्या शेतकºयांचे धान खरेदी करीत होते. मात्र यावर्षी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी आमच्या दिघोरी पारडी नावाने सुरू असलेल्या केंद्रात दिघोरीचे धान खरेदी करू नये, असे सांगितले आहे. यावर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना मार्ग सांगण्यात आले. यात अजून एक खाली गोदाम आहे. त्यामुळे गोदाम दिघोरी केंद्र या नावाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, पुढील उत्तर आल्यावर अंमलात आणली जाईल.
-अरुण गभने, उपाध्यक्ष, खरेदी विक्री संघ.
जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी दिघोरीच्याच गोदामात दिघोरीचे धान खरेदी न करण्याचा जो ओदश दिला, हा अत्यंत संतापजनक आहे. या आदेशामुळे शेतकºयांनी शेतात केलेल्या मेहनतीचा अपमान झाला. पुढील दोन दिवसात दिघोरीच्या शेतकºयांचे धान खरेदी न केल्यास शेतकरी जन आंदोलन उभारून दिघोरीचे धान दिघोरी येथील गोदामात खरेदी करण्यास भाग पाडू.
-रवी हटवार, अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळ.